मार्केटिंग एजंटची हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वेरुळावर
By Admin | Updated: January 13, 2017 16:46 IST2017-01-13T16:43:16+5:302017-01-13T16:46:07+5:30
औरंगाबादमध्ये एका मार्केटिंग एजंटची हत्या करुन त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची घटना समोर आली आहे.

मार्केटिंग एजंटची हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वेरुळावर
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 13 - हर्बल कंपनी, विमा कंपनी सारख्या अनेक कंपनींमध्ये मार्केटिंग एजंट म्हणून काम करणा-या एका तरुणाची निर्घृण हत्या करुन मारेक-यांनी त्याचा मृतदेह रेल्वेरूळावर फेकल्याची घटना समोर आली आहे. अमोल साबळे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून सुंदरवाडी शिवारातील रेल्वेरुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्याच्या हत्येची घटना उजेडात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप कमी वेळातच अमोलला मार्केटिंग व्यवसायात चांगले यश मिळाले. 4 वर्षापूर्वी 10 लाख रुपयांची कारही त्याने खरेदी केली. कार खरेदी केल्यापासून त्याचा मित्रपरिवारही वाढला होता. व्यवसायानिमित्त तो ब-याचदा राज्याबाहेरही जात असत. महिन्यातील 10 ते 20 दिवस तो घराबाहेर रहात. दरम्यान, गुरुवारी दुपारी तो घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही. अज्ञातांनी त्याच्या कारमध्येच धारदार शस्त्रांनी गळा चिरुन त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह रेल्वेरुळावर फेकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.