बाजारपेठेतील उलाढाल ५० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:01 IST2017-08-07T00:01:06+5:302017-08-07T00:01:06+5:30

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होऊन महिना उलटला आहे. प्रत्येक वस्तूवरील कर वेगवेगळे असल्याने कर आकारणीबद्दल अजूनही व्यापाºयांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे

 The market turnover is around 50 percent | बाजारपेठेतील उलाढाल ५० टक्क्यांवर

बाजारपेठेतील उलाढाल ५० टक्क्यांवर

प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होऊन महिना उलटला आहे. प्रत्येक वस्तूवरील कर वेगवेगळे असल्याने कर आकारणीबद्दल अजूनही व्यापाºयांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. काही वस्तूच्या किंमती कमी तर काहींच्या वाढल्या आहेत. नवीन करप्रणाली लागू झाल्यानंतरचे पहिले संक्षिप्त विवरणपत्र भरण्याच्या तयारीत व्यापारी गुंतले आहेत.
दुसरीकडे पावसाने ताण दिल्याने भविष्यातील अनिश्चित वातावरणामुळे ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागातील उलाढाल कमालीची घटली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंची मागणी निम्म्याने कमी झाली आहे.
किराणा बाजारपेठेतही परिणाम
पॅकिंग, ब्रँडेड धान्यावरच ५ टक्के जीएसटी आकारला जात आहे. यामुळे ब्रँडेड गहू, तांदूळ, डाळीची विक्री घटली आहे. परिणामी, अनेक कंपन्या बिनाब्रँडेड धान्य, डाळी बाजारात आणत आहेत. ब्रँडेड तेलाची विक्रीही घटली आहे. दुसरीकडे सौंदर्य प्रसाधनावर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारला जात आहे. यामुळे सौंदर्य प्रसाधने महागली आहेत; मात्र ब्रँडेड खरेदी करणारा एक मोठा ग्राहकवर्ग आहे, तो कोणतीही तडजोड न करता ब्रँडेडच माल खरेदी करीत असल्याने व्यापाºयांनाही काही प्रमाणात ब्रँडेड माल दुकानात ठेवावा लागत
आहे.
विना बँ्रडेड जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर आहेत. अनेक व्यापारी असे आहेत की, त्यांच्याकडे संगणक नाहीत, ते हातानेच बिल तयार करीत आहेत. २०० रुपयांवरील खरेदीवर जीएसटी लावणे बंधनकारक केले आहे. यावरून व्यापारी व ग्राहकांमध्ये वाद निर्माण होत आहे. मोंढ्यातील व्यापारी संजय कांकरिया यांनी सांगितले की, पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील मागणी ६० टक्क्यांनी घटली आहे.

Web Title:  The market turnover is around 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.