खरेदीसाठी बाजारात गर्दी

By Admin | Updated: December 25, 2015 00:05 IST2015-12-24T23:41:43+5:302015-12-25T00:05:39+5:30

ख्रि समसनिमित्त बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांनी गर्दी केली होती.

Market crowds for shopping | खरेदीसाठी बाजारात गर्दी

खरेदीसाठी बाजारात गर्दी

ख्रि समसनिमित्त बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांनी गर्दी केली होती. कोणी केक खरेदी करीत होते तर कोणी ख्रिसमस ट्री, घंटी इ. साहित्य खरेदी करत होते. काही जण रेडिमेड फराळाचे विविध प्रकार खरेदी करताना दिसून आले.
शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, मछली खडक, कुंभारवाडा, टिळक पथ, निराला बाजार, उस्मानपुरा, छावणी इ. भागांत खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. नाताळासाठी बाजारही मागील १० दिवसांपासून सजला होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दुकानदारांनी दर्शनी भागात विविध साहित्य आकर्षकरीत्या मांडणी करून ठेवले होते. सांताक्लॉजचे मुखवटे व संपूर्ण पोशाखाचे शहरात व शहराबाहेरील महामार्गाच्या कडेला भरपूर स्टॉल लागले आहेत. यंदा सांताक्लॉजच्या मुखवट्यांची विक्री चांगली झाल्याची माहिती मोहंमदभाई या विक्रेत्याने दिली.शहरातील डेकोरेशनच्या दुकानात आॅप्टिक फायबरमधील ख्रिसमस ट्री विक्रीला आले आहेत. तसेच फायबर नसलेले ख्रिसमस ट्री सुद्धा विक्री होत आहेत. ३ फुटांपासून ते ५ फुटांपर्यंतचे ट्री विकले जात आहेत. विक्रेता संतोष जाधव याने सांगितले की, १० दिवसांपासून आकाशकंदिल व चिनी बनावटीच्या लाईटिंगची जास्त विक्री होत आहे. मछली खडक परिसरातील विक्रेते म्हणाले की, घंटी, बॉल्स, काचेचे एंजल्स, थर्माकोल प्रॉडक्टस्, स्टार्स, फुले अशा विविध वस्तूंची खरेदीही जोमात सुरू आहे. याशिवाय येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावाही अनेक दुकानात खास विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. लहान-मोठ्या आकारातील या रेडिमेड देखाव्यांना प्रत्येक ग्राहक आवर्जून खरेदी करीत आहे. याशिवाय बेकरीच्या दुकानात ड्रायफ्रूटस् रम, मेवामिश्रित केक खरेदीसाठीही गर्दी दिसून आली. यात रम केक, खजूर आणि अक्रोडच्या कुकीज, हनी बनाना ब्रेड, पोटॅटो ब्रेड, पायनापल पेस्ट्री, कॉर्न नानकटाई इ.ची खरेदीही जोमात होताना दिसून आली. शाळांमधूनही यंदा मोठ्या प्रमाणात केक व पेस्ट्रीच्या आॅर्डर मिळाल्याचे केक विक्रेत्यांनी सांगितले. शुभेच्छापत्रांचे विक्रेता सुहास देशपांडे यांनी सांगितले, की, ई-मेल, व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यातही सध्या ख्रिसमससाठीच्या इंग्रजी शुभेच्छापत्रांना चांगली मागणी होती.

Web Title: Market crowds for shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.