बाजार समितीत तुरीची होतेय विक्रमी आवक

By Admin | Updated: March 3, 2017 01:26 IST2017-03-03T01:25:31+5:302017-03-03T01:26:30+5:30

जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीची विक्रमी उत्पादन होत आहे.

The market committee is expected to record a record number | बाजार समितीत तुरीची होतेय विक्रमी आवक

बाजार समितीत तुरीची होतेय विक्रमी आवक

जालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीची विक्रमी उत्पादन होत आहे. परिणामी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेड तूर खरेदी केंद्रावर प्रचंड आवक सुरू असल्याने खरेदी बंद ठेवण्याची वेळ नाफेडवर आली आहे. बाजार समितीत सुमारे १ लाख क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सोबतच कडधान्य वर्ष असल्याने तुरीची सुमारे ३० हजारपेक्षा जास्त हेक्टरवर लागवड झाली. पावसामुळे अडीच लाख क्विंटल तुरीची उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, मंठा तालुक्यात विक्रमी आवक झाल्याने नाफेड केंद्राने खरेदी बंद ठेवली होती. आता शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर हे खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांच वाढती गर्दी नाफेडसाठी आवघड ठरत आहे. दिवसाकाठी तीन ते चार हजार क्विंटल तुरीची खरेदी होत आहे. नाफेड केंद्रात तुरीला ५०५० एवढा हमीभाव असल्याने शेतकऱ्यांचे पहिले प्राधान्य नाफेड केंद्रालाच आहे. खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा नाफेड केंद्रावर जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी आठ-आठ दिवस मुक्कामी थांबून नाफेडलाच तूर विक्री करीत आहे. जलाना येथील नाफेडचे अधिकारी शिवानंद पाटील म्हणाले ६२ हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची खरेदी झाली आहे. साडेतीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तूर विक्री केली आहे. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नाफेडकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून तूर खरेदी सुरू आहे. यासाठी हमालमापडीसह पंधरा ते वीस कर्मचारी तूर खरेदी केंद्रात नियुक्त करण्यात आले आहेत.नवीन तूर आली तेव्हा नाफेड केंद्रावर आवक कमी होती. शेतकऱ्यांनी नगदी पैसे मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना पसंती दिली होती. अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर विक्री केली. बाजार समितीकडे सुमारे एक लाख क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक झाल्याची माहिती आहे. खाजगी व्यापारी तुरीला प्रत पाहुन साडेतीन हजार ते चार हजार रूपयांपर्यंतचा भाव देते होते. नाफेड केंद्राने तुरीला ५०५० एवढा हमी भाव जाहीर केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या नाफेड केंद्रावर उड्या पडत आहेत. जालना बाजार समितील केंद्रावर आजही हजारो शेतकरी तूर विक्रीसाठी मुक्कामी असल्याचे चित्र आहे. जालना तालुक्यासह परतूर व अंबड येथील नाफेड खरेदी केंद्रावरही तुरीची विक्रमी आवक सुरू आहे. दूरवर वाहनांच्या रांगा कायम आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गत दोन ते तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा तुरीच्या पिकांने सर्व उच्चांक मोडले आहेत. दोन लाख क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन निघत असून, गतवर्षी ६० ते ७० क्विंटल तुरीचे उत्पादन निघाले होते असे कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी सांगितले.

Web Title: The market committee is expected to record a record number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.