बाजार समिती सभापतीपदी राजेश इंगोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:31 IST2017-08-24T00:31:54+5:302017-08-24T00:31:54+5:30
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजेश पाटील इंगोले यांची तर उपसभापतीपदी अशोक अडकिणे यांची बिनविरोध निवड झाली.

बाजार समिती सभापतीपदी राजेश इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजेश पाटील इंगोले यांची तर उपसभापतीपदी अशोक अडकिणे यांची बिनविरोध निवड झाली. २३ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेस १८ पैकी १४ संचालक उपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या वेळी झालेल्या तणावाच्या एकदम विपरित अत्यंत शांततेत निवड पार पडली.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती राष्टÑवादीच्या ताब्यात होती. सभापतीपदी राजू पाटील नवघरे व उपसभापती तानाजी पाटील बेंडे हे दोघे विराजमान होते. मात्र या दोघांच्या विरोधात राष्टÑवादीच्याच संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला. त्यास शिवसेनेनेही पाठिंबा दिला.
या अविश्वास प्रकरणाने तालुक्याच्या राजकारणात प्रचंड वादळ उठले होते. कार्यकर्त्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला होत्या; परंतु ठराव पास झाला होता. त्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी २३ रोजी वसमत येथे विशेष सभा बोलावण्यात आली होती. पीठासीन अधिकारी म्हणून सहा. उपनिबंधक के.बी.फिसके, बाजार समितीचे सचिव एस.एन.शिंदे यांची उपस्थिती होती. सभागृहात १८ पैकी १४ संचालक हजर राहीले. राष्टÑवादीचे चार संचालक गैरहजर राहीले. सभापतीपदासाठी राष्टÑवादीचे राजेश पाटील इंगोले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. उपसभापती पदासाठीही अशोकराव अडकिणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. दोघांचीही बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला.
सभापती राजेश इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्टÑवादीचेच सभापती उपसभापती पुन्हा निवडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीचा विकास व शेतकºयांच्या हितासाठी आम्ही काम करणार असल्याचे ते म्हणाले.