बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज विक्री सुरू
By Admin | Updated: June 9, 2015 00:30 IST2015-06-09T00:30:24+5:302015-06-09T00:30:24+5:30
लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, नामनिर्देशनपत्र देण्यास प्रारंभही झाला आहे.

बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज विक्री सुरू
लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, नामनिर्देशनपत्र देण्यास प्रारंभही झाला आहे. ६ ते २० जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत नामनिर्देशनपत्र दिले जात आहेत. बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक २१ आॅगस्ट रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक बी.एल. वांगे यांनी दिली.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात उमेदवारी अर्ज मिळत आहेत. २२ जून रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर २३ जून रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्र वैध व अवैध ठरविले जाणार आहेत. २५ जून ही तारीख अर्ज मागे घेण्याची असून, दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ आहे. निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.
या अर्जांवर अपिल झाले असल्यास अपिलाच्या निर्णयानंतर उमेदवारी मागे घेण्याची मुदत दुसऱ्या दिवशीही असेल. अंतिम उमेदवारांत २१ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीचा प्रारंभ होणार आहे. मतदान केंद्राची ठिकाणे व मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर केले जाणार आहे. संस्था मतदारसंघात दोन जागा महिलांसाठी राखीव, एक जागा इतर मागासवर्गीयांसाठी व एक जागा विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीसाठी राखीव असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वांगे यांनी सांगितले.
लातूर बाजार समितीच्या निवडणुकीनंतर जळकोट, चाकूर, शिरूर अनंतपाळ, औसा, रेणापूर, देवणी व निलंगा बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. जळकोट, चाकूर, शिरूर अनंतपाळ व औराद शहाजानी बाजार समितीच्या मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असून, रेणापूर, देवणी व निलंगा बाजार समितीच्या मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध झाली आहे.
लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वांगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात २६ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जांवर कोणाचे अपिल झाले असल्यास अपिलाच्या निर्णयानंतर उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यावर दुसऱ्या दिवशी त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत २५ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.एल. वांगे यांनी सांगितले.
४मतदान केंद्राची ठिकाणे अद्याप जाहीर झाली नाहीत. २६ जूनपर्यंत ती जाहीर केली जातील. २१ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल, असेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.