बाजारपेठ सजू लागली...
By Admin | Updated: October 17, 2014 00:27 IST2014-10-17T00:22:59+5:302014-10-17T00:27:33+5:30
लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार जिल्हाभर जोरात सुरू होता. त्यामुळे दिवाळीचा सण समोर येऊनही बाजारपेठेत रेलचेल नव्हती.

बाजारपेठ सजू लागली...
लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार जिल्हाभर जोरात सुरू होता. त्यामुळे दिवाळीचा सण समोर येऊनही बाजारपेठेत रेलचेल नव्हती. मात्र प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता बाजारात दिवाळी सणाची चाहूल सुरू झाली आहे. आकाशदिवे, पणत्या व अन्य साहित्याने बाजारपेठ सजत आहे.
शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर पणत्या तसेच आकाशदिव्यांचे स्टॉल लागले आहेत. स्टीलच्या व मातीच्या पणत्या बाजारात आल्या आहेत. निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर बाजारात ग्राहकांची रेलचेल सुरू झाली आहे. मातीच्या पणत्या ३०, ४०, ५० रुपये डझन या भावाने मिळत आहेत. तर स्टीलच्या पणत्या ६० ते ८० रुपये डझनपर्यंत मिळत आहेत. शहरातील गंजगोलाई परिसरातील बाजारपेठेत असे स्टॉल लागले आहेत. येत्या २३ आॅक्टोबरपासून दिवाळीला प्रारंभ होत असल्याने व्यावसायिकांनी आपली दुकाने सजविली असून, ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळी आॅफरचाही अनेक दुकानदारांनी नियोजन केले असून, अनेक आकर्षक सोडती ग्राहकांसाठी ठेवल्या आहेत.