राख्यांचा बाजार फुलला
By Admin | Updated: August 7, 2014 23:36 IST2014-08-07T23:21:50+5:302014-08-07T23:36:40+5:30
जालना: महागाईमुळे राख्यांच्या किंमती सुद्धा पंधरा टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

राख्यांचा बाजार फुलला
जालना: अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळी सदृश्यस्थितीसह भडकलेल्या महागाईमुळे राख्यांच्या किंमती सुद्धा पंधरा टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
रक्षाबंधन हा बहीण- भावाचा ऋणाणूबंधाचा सण. त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. विशेषत: हा सण प्रत्येक कुटुंबियांत मोठ्या उत्साहाने साजरा होतो. याही वर्षी श्रावणमासात रक्षाबंधनाचा सण रविवारी साजरा होणार असून, त्या पार्श्वभूमीवरच बाजारपेठांमधून गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात राख्या दाखल झाल्या आहेत. मुंबई दिल्ली, कलकत्ता, नागपूर वगैरे भागातून ठोक विक्रेत्यांनी हा माल आणला असून, याहीवर्षीच्या राख्या लक्षवेधी ठरतील अशी चिन्हे आहेत.
छोट्या मोठ्या आकराच्या, रंगबेरंगी व आकर्षक अशा विविध स्टॉल्समधून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. रेशीम दोऱ्यापासून ते चिनी बनावटीच्या राख्यांचा यात समावेश आहे.
विशेषत: बालगोपाळांकरिता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या राख्या पसंतीस उतरतील अशी चिन्हे आहेत. कार्टूनच्या मालिकांमधून झळकणाऱ्या स्पायरडरमॅन, पोकीमॅन, मोगली, धार्मिक मालिकांमधील बाल गणेश, बाल हनुमान, बाळकृष्ण, छोटाभीम, मिस्टरबिन, तारकमेहता मालिकेतील टप्पू सेना आदी विविध राख्या उपलब्ध आहेत.
नेहमीप्रमाणे रंगीबेरंगी झाडे फुले, नक्षीकाम, चांदीचे वर्क असणाऱ्या राख्याही ग्राहकांसाठी आकर्षण ठरणार आहे. (प्रतिनिधी)