शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रिटेलमधील विदेशी गुंतवणूकी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:48 IST

केंद्र सरकारने किरकोळ व्यापार क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याचा फटका देशभरातील व्यापाऱ्यांना बसत आहे.

औरंगाबाद : किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात देशभरातील व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारला आहे. यास औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानेही पाठिंबा दर्शविला आहे. या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्येसुद्धा  बंद पाळण्यात आला. 

केंद्र सरकारने किरकोळ व्यापार क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याचा फटका देशभरातील व्यापाऱ्यांना बसत आहे. याच्या विरोधात आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. यात शहर तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सहभागी होत बाजारपेठा बंद ठेवल्या. शहरातील , मोंढा, जाधववाडी, कॅनॉट गार्डन, औरंगपूरा, शहागंज, पैठणगेट, गुलमंडी व वाळूज  या मुख्य बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. 

अन्न, औषध प्रशासनाचे नियंत्रण कक्षऔषधांची दुकाने बंद असले तरी रुग्णांना औषधी मिळावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यासंदर्भात प्रभारी सहआयुक्त सं. शं. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगपुऱ्यातील कार्यालयात औषध निरीक्षक आर. एम. बजाज व व्ही. पी. महाजन हे नियंत्रण कक्षात दिवसभर बसून राहणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून काही मोठ्या हॉस्पिटलमधून औषधी पुरवठा करण्यात येईल. औषध विक्रेत्या संघटनेनेही औषधी भवन येथील कार्यालयात दोन जणांची नेमणूक केली आहे. अतिआवश्यक औषधींचा पुरवठा येथून करण्यात येईल. रुग्णांच्या नातेवाईकांनी यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणणे आवश्यक आहे, असे संघटनेने कळविले आहे. 

प्रमुख मागण्या१) बड्या आॅनलाईन कंपन्यांतील करार रद्द करण्यात यावा. २) किरकोळ विक्रीत थेट विदेशी गुंतवणूक धोरण रद्द करावे. ३) जीएसटीचे २ स्तर करण्यात यावे. दंडाची रक्कम कमी करावी.४) जीएसटीत तुरुंगवासाची शिक्षा रद्द करण्यात यावी. ५) व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावी. ६) आयकरची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढविण्यात यावी. ७) कलम ८० सीच्या आधारे मिळणारी सूट २.५ लाखांपर्यंत वाढवावी. ८)अन्न सुरक्षा कायद्याचे पुनर्विलोकन करण्यात यावे. ९) व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारbusinessव्यवसाय