विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:05 IST2021-04-04T04:05:22+5:302021-04-04T04:05:22+5:30
रेश्मा यांनी शुक्रवारी संध्याकाळी तिच्या राहत्या घरी विष प्राशन केले. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला फुलंब्री ग्रामीण ...

विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
रेश्मा यांनी शुक्रवारी संध्याकाळी तिच्या राहत्या घरी विष प्राशन केले. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तिचा काही वेळातच मृत्यू झाला. यासंदर्भात वडोद बाजार पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. मृत्यूची बातमी रेश्माच्या माहेरकडील मंडळींना देण्यात आली. काही वेळातच रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने माहेरकडील मंडळी जमा झाली. एवढ्या संख्येने माहेरकडील मंडळी आल्याने पती गजानन काटकर याने घटनास्थळावर पळ काढला.
शनिवारी सकाळी रेश्मा यांचा मृतदेह खामगावात आणला गेला. अंत्यसंस्कार नवऱ्याच्या हस्तेच करा, अशी भूमिका माहेरकडील मंडळींनी घेतली. तेव्हा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव नातेवाइकांची समजूत काढली. तुमची काही तक्रार असेल, तर पोलीस ठाण्यात नोंद करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासित केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात रेश्मा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जी.टी. लहासे, चेळेकर हे करीत आहेत.