पिंपळगावात विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: January 12, 2015 14:16 IST2015-01-12T14:12:11+5:302015-01-12T14:16:18+5:30
पिंपळगाव रेणुकाई येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १0 वाजता उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पिंपळगावात विवाहितेची आत्महत्या
पारध : पिंपळगाव रेणुकाई येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १0 वाजता उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
रेखा गणेश परणकर (वय २२) असे या विवाहित तरुणीचे नाव आहे. सकाळी १0 वाजता तिच्या राहत्या घरात पत्र्याच्या आढय़ाला दोरी बांधून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. विजय नारायण धायडे यांनी ही माहिती पारध पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहावर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा वैद्यकीय अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
दरम्यान, पारध पोलिसांनी रविवारी सायंकाळी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)