विवाह़ितेचे आत्महत्या प्रकरण; चार जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:04 IST2021-09-03T04:04:34+5:302021-09-03T04:04:34+5:30

दौलताबाद : शहरातील भीमनगरात राहणाऱ्या मनीषा नितेश पुसे या १९ वर्षीय विवाहितेने ३० ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली ...

Marital suicide cases; Charges filed against four persons | विवाह़ितेचे आत्महत्या प्रकरण; चार जणांवर गुन्हा दाखल

विवाह़ितेचे आत्महत्या प्रकरण; चार जणांवर गुन्हा दाखल

दौलताबाद : शहरातील भीमनगरात राहणाऱ्या मनीषा नितेश पुसे या १९ वर्षीय विवाहितेने ३० ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मनीषा पुसे यांच्या भावाने सासरच्या जालाला कंटाळून बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप करून दौलताबाद पोलीस ठाण्यात सासरकडील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

राहुल कचरूबा सुटे (२७, रा. सातगाव मसला, जि. बुलडाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा पुसे यांचा पती नीलेश पुसे, सासू नंदाबाई पुसे, सासरे हरसिंग पुसे, दीर सुरेश पुसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रकरणी मनीषा हिचे दीड वर्षापूर्वी नितेश हरसिंग पुसे (रा. दौलताबाद) याच्यासोबत रीतीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नाप्रसंगी एक लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. लग्नात पन्नास हजार दिले गेले. त्यानंतर पन्नास हजारांसाठी तगादा लावला जाऊ लागला. माहेरकडील मंडळींना हुंड्याची रक्कम देण्यास विलंब होत असल्याने माहेरकडील मंडळी मनीषाचा छळ करीत असत. वेळोवेळी तिला मारहाण केली जात होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजश्री आडे करीत आहेत.

Web Title: Marital suicide cases; Charges filed against four persons