पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरकडील पाच जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST2021-07-07T04:05:01+5:302021-07-07T04:05:01+5:30

वैजापूर तालुक्यातील बिरोळा येथील पूजाचे सवंदगाव येथील संदीप नारायण म्हस्के यांच्याशी १९ मे २०२० रोजी विवाह झाला. लग्नानंतर दोन ...

Marital harassment for Rs 5 lakh, crime against five in-laws | पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरकडील पाच जणांविरोधात गुन्हा

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरकडील पाच जणांविरोधात गुन्हा

वैजापूर तालुक्यातील बिरोळा येथील पूजाचे सवंदगाव येथील संदीप नारायण म्हस्के यांच्याशी १९ मे २०२० रोजी विवाह झाला. लग्नानंतर दोन महिन्यांनीच सासरकडील मंडळींनी पूजाला माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा सुरू केला. तिने माहेरहून दोन लाख रुपये देखील आणले. त्यानंतर पुन्हा तीन लाख रुपयांसाठी तिचा छळ सुरू झाला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घराबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पूजा म्हस्के हिने दिलेल्या फिर्यादीवरून संदीप नारायण म्हस्के, नारायण दत्तू म्हस्के, सरला नारायण म्हस्के, अश्विनी नारायण म्हस्के (सर्व रा.सवंदगाव), अर्चना सुनील निंबाळकर व सुनील भाऊसाहेब निंबाळकर (दोघेही रा. लाडगाव) या सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हवालदार हुकूमसिंह डांगर हे करीत आहेत.

Web Title: Marital harassment for Rs 5 lakh, crime against five in-laws