वाकला येथे पैशांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:04 IST2021-05-26T04:04:26+5:302021-05-26T04:04:26+5:30

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील रूपाली हिचा विवाह वाकला येथील प्रवीण किशोर आहेर यांच्यासोबत १५ जून २०२० रोजी रितिरिवाजाप्रमाणे झाला. ...

Marital harassment for money at Wakla | वाकला येथे पैशांसाठी विवाहितेचा छळ

वाकला येथे पैशांसाठी विवाहितेचा छळ

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील रूपाली हिचा विवाह वाकला येथील प्रवीण किशोर आहेर यांच्यासोबत १५ जून २०२० रोजी रितिरिवाजाप्रमाणे झाला. लग्नानंतर सासरच्यांनी तीन महिने चांगले नांदविले. त्यानंतर पती प्रवीण आहेर, सासरा किशोर आहेर, सासू मीराबाई आहेर, संतोष आहेर, अर्चना आहेर हे घरातील व शेतातील कामे तसेच इतर लहान कारणांवरून शिवीगाळ करून त्रास देऊ लागले. तसेच ट्रॅक्टर घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून दीड लाख रुपये घेऊन ये, म्हणत वेळोवेळी शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागले. ही बाब तिने आई-वडिलांना सांगितली. त्यांनीही मुलीच्या सासरी जाऊन त्यांना समजावून सांगितले. मात्र, तरीही रूपालीचा त्रास कमी झाला नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये सासरकडील मंडळींनी पैसे आणल्याशिवाय घरात यायचे नाही, असे म्हणून रूपालीला घरातून हाकलून दिले. तेव्हापासून रूपाली माहेरी राहत आहे. अखेर रूपालीने शिऊर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. संदीप धनेधर, विष्णू जाधव करीत आहेत.

Web Title: Marital harassment for money at Wakla