विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:06 IST2021-02-06T04:06:59+5:302021-02-06T04:06:59+5:30

........========== भरधाव कारच्या धडकेत व्यापारी जखमी औरंगाबाद: भरधाव कारच्या धडकेत व्यापारी जखमी झाल्याची घटना २५ जानेवारी ...

Marital harassment; Crime against six of the father-in-law | विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांवर गुन्हा

विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांवर गुन्हा

........==========

भरधाव कारच्या धडकेत व्यापारी जखमी

औरंगाबाद: भरधाव कारच्या धडकेत व्यापारी जखमी झाल्याची घटना २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील पद्मपाणी येथे घडली. यात प्रवीण रामेश्वर पारेख (४६, रा. नक्षत्रवाडी, पैठण रोड) हे जखमी झाले. पारेख दुचाकीने रेल्वे स्टेशनकडे जात असताना, मागून आलेल्या भरधाव कारने (एमएच-२०-सीएस-३३८८) त्यांना उडविले. यात त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आणि दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.....====================

एटीएममधील सीसीटीव्ही, अग्निरोधक सिलिंडर लंपास

औरंगाबाद : आयएमए हॉलजवळील आयडीबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही आणि अग्निरोधक सिलिंडर ३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी पळविले. या प्रकरणी बँकेचे महाव्यवस्थापक मोनाल सारंग यांनी क्रांतिचौक ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला.

.......==========-====-=-======--

तक्रार मागे घेण्यावरून आपसात मारहाण

औरंगाबाद : जुनी तक्रार मागे घेण्यावरून बालाजीनगर येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. ही घटना ३ फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याविषयी जवाहरनगर ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. जमादार जाधव तपास करत आहेत.

Web Title: Marital harassment; Crime against six of the father-in-law