शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात मार्च महिना हॉट; पारा ३८.२ अंशांवर, उष्णता आणखी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:46 IST

बुधवारने मोडला उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड; पारा ३८.२ अंशांवर, किमान तापमानही वाढले

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात १२ मार्च रोजी उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ३८.२ अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाचा पारा होता. किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअसवर होते. यंदाच्या उन्हाळ्यातील हे रेकॉर्डब्रेक तापमान आहे.

तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. ११ मार्च रोजी ३७.४ अंश सेल्सिअस कमाल, तर २०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मार्चमधील १२ दिवसांत पाच वेळा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. दुपारपासून सायंकाळपर्यंत रस्त्यावरची वर्दळ तुरळक होती. यंदाच्या उन्हाळ्यातील हे उच्चांकी तापमान १२ मार्च रोजी नोंदविले गेले. ११ मार्च रोजी ३७.४ अंश सेल्सिअस तापमान होते. मार्चचा पहिला आठवडा उष्णच होता. आता दुसऱ्या आठवड्यातही उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. यंदाच्या मार्च महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात उन्हाळा तीव्र असल्याचे जाणवते आहे.

यंदाचा मार्च महिना हॉटहवामान विभागाच्या रेकॉर्डनुसार १९०१ नंतर २०२२ मधील मार्च महिना सर्वात उष्ण म्हणून नोंदविला गेला. त्यानंतर यंदाचा मार्च महिना उष्ण म्हणून नोंद झाली आहे. येणाऱ्या काळात आणखी उष्णता वाढेल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.

तापमान वाढीचे नवे विक्रम होतीलवनसंपदा कमी होणे, काँक्रिटीकरणातून इमारती, सिमेंट रस्त्यांची निर्मिती, वाहनांतून होणारे कार्बन उत्सर्जन यामुळे मार्च महिन्यांत तापमान वाढले आहे. आगामी काळात यापेक्षा जास्त उष्णता जाणवेल. त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढेल. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तापमान वाढीचे नवे विक्रम यंदाच्या उन्हाळ्यात पाहायला मिळतील, अशी शक्यता आहे. १९०१ ते २०२५ पर्यंत या काळात २०२२चा मार्च महिना उष्ण होता. त्यानंतर यंदाचा मार्च उष्ण ठरला आहे.-प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान शास्त्रज्ञ

वाढलेले तापमान (अंश सेल्सिअस)तारीख- कमाल-किमान३ मार्च- ३७.० -२०.४८ मार्च- ३७.० -१८.०९ मार्च- ३७.२ - १८.०११ मार्च- ३७.४ -२०.८१२ मार्च- ३७.२- २१.८

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHeat Strokeउष्माघात