शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा शिक्षक निवडणूक: उस्मानाबादेत सर्वाधिक, तर औरंगाबादेत सर्वांत कमी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 11:56 IST

सरासरी ८६.०१ टक्के गुरुजींनी बजावला हक्क

औरंगाबाद :मराठवाडाशिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी विभागात शांततेत मतदान पार पडले. सरासरी ८६.०१ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सर्वाधिक ९२.३८ टक्के मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात झाले, तर सर्वांत कमी ७९.४० टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले. २ फेब्रुवारी रोजी या १४ उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागेल. चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्रामसमोरील कंपनीच्या आवारात मतमोजणी होईल. सुमारे १०० टेबलवर मतमोजणी होणार असल्यामुळे निकाल लवकर हाती येऊ शकतो.

विभागात २२७ मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. ४६,७८० पुरुष, तर १४,७४९ महिला मतदारांचा समावेश होता. ६१ हजार ५२९ मतदारांपैकी ५३ हजार ६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेड जिल्ह्यात सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जालना ८१.९९ टक्के, परभणी ९०.१७ टक्के, हिंगोली ९१.२७ टक्के, नांदेड ८६.४५ टक्के, लातूर ८५.७६, तर बीडमध्ये ९०.२७ टक्के मतदान झाले. २०१७ च्या तुलनेत १ हजार १८ मतदान जास्त झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. विक्रम काळे यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे किरण पाटील यांनी अपर तहसील कार्यालय, औरंगाबाद येथे मतदान केले. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी कंधार तालुक्यात मतदानाचा हक्क बजावला. शिक्षक सेनेचे मनोज पाटील यांनी रेल्वे स्टेशन भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. काळे यांनी कुठेही प्रचार कार्यालय उघडले नव्हते. नेटवर्क आणि तीन टर्ममधील कामांच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढविली. किरण पाटील यांनी पक्षाच्या नेटवर्कवर मैदानात उडी घेतली.

जुन्या पेन्शन योजनेवरूनच प्रचार.....यावेळच्या निवडणुकीत जुनी पेन्शन लागू करण्यावरून जोरदार प्रचार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारला दोषी ठरविले, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेन्शन योजनेवरून राज्यातील सत्ताधारी वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे प्रत्युत्तर दिले. आ. काळे कुटुंबांचे २००२ पासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्मकबन्सीच्या वातावरणाची लहर निवडणुकीत होती. भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी त्या वातावरणाचा फायदा घेत प्रचार केला. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी, तर भाजपचे नितीन कुलकर्णी यांनी बंडखोरी केली. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव, शिक्षक समन्वय संघाचे उमेदवार मनोज पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला. शिवाय संजय तायडे, कालिदास माने यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. २०१७ साली २० उमेदवार मैदानात होते. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते फुटली होती. यावेळीदेखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

५० वर्षांत मतदारसंघावर कुणाचे नेतृत्व?२००४ पर्यंत शिक्षक संघाचे वर्चस्व मतदारसंघावर राहिले. १९७४ साली पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक झाली. तेव्हा शिक्षक संघाचे डी. के. देशमुख आमदार झाले. १९८६ पर्यंत त्यांनीच मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर १९९२ पर्यंत राजाभाऊ उदगीरकर यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. १९९८ पर्यंत पी. जी. दस्तूरकर हे आमदार होते. २००४ पर्यंत प. म. पाटील यांनी नेतृत्व केले. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव काळे यांनी शिक्षक संघाकडून हा मतदारसंघ हिसकावला. २००६ पासून २०२३ पर्यंत विक्रम काळे यांनी या मतदारसंघातून हॅट्ट्रिक केली. भाजपाने २००६ पासून या मतदारसंघाकडे पूर्ण ताकदीने लक्ष देण्यास सुरुवात केली. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत यावेळच्या निवडणुकीत झाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकTeacherशिक्षकMarathwadaमराठवाडा