मराठवाड्याचा आधारवड हरपला : मान्यवरांना शोक

By Admin | Updated: June 4, 2014 01:30 IST2014-06-04T01:00:14+5:302014-06-04T01:30:47+5:30

लातूर - केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे हे दिल्लीहून सकाळी परळीस जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले असता त्यांच्या वाहनास अपघात घडला़

Marathwada support base: mourners mourn | मराठवाड्याचा आधारवड हरपला : मान्यवरांना शोक

मराठवाड्याचा आधारवड हरपला : मान्यवरांना शोक

 लातूर - केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे हे दिल्लीहून सकाळी परळीस जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले असता त्यांच्या वाहनास अपघात घडला़ त्यात मुंडे यांचे अनपेक्षितपणे निधन झाले़ त्यांच्या या निधनानंतर जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी शोकाकूल झाले आहेत़ शोकमग्न झालेल्या पदाधिकार्‍यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या़ संघर्षात गेले आयुष्य... गोपीनाथराव मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले़ केंद्रात मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी लागलीच ग्रामीण भागाच्या विकासासाठी कंबर कसली होती़ संकल्प सोडला होता़ त्यासाठी पावले उचलायला सुरूवातही त्यांनी केली होती़ दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर झडप घातली़ त्यांनी महाराष्ट्रात केलेले काम आजही लोकांच्या मनात ताजे आहे़ क्डॉ़जनार्दन वाघमारे, माजी खासदार बहुजनांचा कैवारी हरवला... दीन-दलित, बहुजनांचे कैवारी असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने बहुजन समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागाचा विकासाचा ध्यास घेतलेल्या मुंडे साहेबांच्या निधनामुळे मराठवाडा गहिवरला आहे. सर्वसामान्य कुटुंबात पुढे आलेले हे नेतृत्व भावी पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. क्डॉ. सुनील गायकवाड, खासदार स्वकर्तृृत्वातून यशोशिखर स्वकर्तृत्वातून यशाचे शिखर गाठणारे नेते म्हणून मुंडे परिचित होते. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांचे सर्वांसोबतच संबंध हे दृढ होते. देशाच्या विकासासाठी मोठी संधी आलेली असताना नियतीने ती हिरावून नेली. क्त्र्यंबकदास झंवर, संचालक, भेल सहकारात त्यांचे मोठे योगदाऩ़़ महाराष्ट्रातील सर्वात मोठा नेता गेल्याचा मनाला खूप मोठा धक्का बसला आहे. गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना आपण त्यांच्यासोबत १५ दिवस होतो. प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख त्यांनीच करून दिली. वैद्यनाथ साखर कारखान्यासह ३२ साखर कारखाने उभे करून त्यांनी सहकारात मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.क्डॉ.गोपाळराव पाटील, माजी खासदार मराठवाड्याचा अपेक्षाभंग झाला़़़ गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची वृत्त ऐकून मनाला धक्काच बसला़ केंद्रात मंत्रीपदावर ते नुकतेच रूजू झाल्याने आमच्या अपेक्षा वाढल्या होत्या़ मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातली़ काही क्षणात मराठवाड्याचा अपेक्षाभंग झाला आहे़ ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्याची शक्ती देवो़ सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची प्रेरणा असेल़ क्रूपाताई पाटील निलंगेकर, माजी खासदार महाराष्ट्राचे मोठे नुकसान लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून, ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्याची शक्ती देवो़ त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा मराठवाड्याला व महाराष्ट्रालाही फायदा झाला असता. क्बस्वराज पाटील, आमदार शेतकरी, शेतमजूर चळवळीतील नेता ऊसतोड कामगार, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न घेऊन गोपीनाथराव मुंडे यांनी नेहमीच लढा दिला. त्यांच्या निधनाने ऊसतोड कामगार व शेतकर्‍यांचा नेता हरवला आहे. देशाचे व महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा व महाराष्ट्राचे त्यांनी दिल्लीतही स्थान निर्माण केले होते. त्यांनी खेड्यांच्या विकासाचा ध्यास घेतला होता. क्विक्रम काळे, शिक्षक आमदार संघर्षशील नेता... गेल्या ४० वर्षांपासून पक्षविरहित त्यांची व आपली मैत्री होती. देशपातळीवर चांगले काम करण्याची संधी मिळाली होती. परळीत सत्कार समारंभासाठी येत असतानाच झालेला अपघात अतिशय दु:खद घटना आहे. क्मनोहरराव गोमारे, समाजवादी नेते जनसंघटन असणारा नेता केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांची जनसंघटन असणारा नेता म्हणून पक्षात ओळख होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांची धडपड असायची. १९८४ च्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत त्यांचा आपणाला सहवास लाभला. एक दिलदार नेता आपल्यातून गेल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. क्शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार बहुजन चळवळीला ब्रेक... महाराष्ट्रातील बहुजनांच्या चळवळीला गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे ब्रेक लागला आहे. सत्ताधारी पक्षातील बहुजनांचे नेते असणारे गोपीनाथराव यांच्याकडे समाज अपेक्षेने पाहत होता. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे गोपीनाथराव यांच्या निधनामुळे मराठवाड्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. क्दत्तात्रय बनसोडे, अध्यक्ष, जिल्हा परिषद गरिबांचा दाता हरवला... गोरगरिबांच्या जीवनात उत्कर्ष निर्माण करणारे नेतृत्व पडद्याआड गेल्याने गरिबांचा दाता हरवल्याचे मोठे दु:ख आहे़ सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणात वेगळा ठसा उमटविणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे़ आता अशाप्रकारचे नेतृत्व निर्माण होणे नाही़ सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना समान न्याय देण्याची भावना गोपीनाथराव मुंडे यांची होती़ क्टी़पी़ कांबळे, माजी आमदार कार्यकर्त्यांना बळ दिले... गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने मराठवाड्याला नवी दिशा मिळण्याची संधी होती़ त्यांनी लाखो सामान्य कार्यकर्त्यांना लढायला शिकविले़ सर्वसामान्य जनता व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा नेता हरवला आहे़ सर्वसामान्यांच्या विकासासाठी आयुष्यभर संघर्ष करणारा एक कणखर, लढाऊ नेता हरपल्याचे अतीव दु:ख आहे़ क्संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार आम्ही पोरके झालो... तत्कालीन रेणापूर मतदार संघावर गोपीनाथ मुंडे यांचे जीवापाड प्रेम होते़ प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखत होते़ आमच्या कुटूंबियांचा तर त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संबंध आहे़ कार्यकर्त्यांवर एवढा प्रेम करणारा नेता पाहिला नाही़ त्यांच्या जाण्यामुळे आम्ही पोरके झालो आहोत़ या दु:खातून सावरणे कठीण आहे़ क्रमेश कराड भाजप नेते परिवारातील सदस्य गेला... महाराष्ट्रातील लढाऊ नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. मागील ३० वर्षांपासून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत ते सातत्याने प्रश्न मांडत होते. त्यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या परिवारातील एक सदस्य गमावल्याचे दु:ख आम्हाला आहे. क्आ़दिलीपराव देशमुख, माजी मंत्री शब्द सुचेनासे झाले... मुंडे साहेबांच्या निधनाची बातमी ऐकली, ही अतिशय दु:खद घटना आहे. बातमी समजताच मला शब्द सुचेनासे झाले. ही घटना अकाली घडली आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे. विलासराव देशमुख साहेबांचे मित्र म्हणून आमच्या कुटुंबियांशी त्यांचा स्नेह होता़ ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्याची शक्ती देवो़ क्अमित देशमुख, राज्यमंत्री विकास कामांची ओढ... गोपीनाथराव मुंडे यांना विकास कामांची नेहमीच ओढ होती. रेणापूर तालुक्याचे नेतृत्व त्यांनी अनेक दिवस केले. आता लातूर ग्रामीण मतदारसंघ झाला आहे. त्यांनी तालुक्यात केलेली कामे मोठी आहेत. त्यांचं नातं हे वडिलांप्रमाणे होतं. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती. त्यांच्या निधनामुळे सामान्यांचा नेता हरवला. क्वैजनाथराव शिंदे, आमदार प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची बांधणी राज्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथराव मुंडे यांनी पक्षाची बांधणी केली. आता देशात चांगले दिवस आल्यानंतर काळाने त्यांच्यावर झडप घातली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी खूप मेहनत घेतली. सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. क्सुधाकर भालेराव, आमदार

Web Title: Marathwada support base: mourners mourn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.