शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
4
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
5
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
6
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
7
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
8
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
9
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
10
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
11
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
12
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
13
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
14
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
15
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
16
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
17
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
18
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
20
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

मराठवाडा वैधानिक विकास मंडळ मृतावस्थेत; मुदतवाढीची शक्यता धूसर!

By स. सो. खंडाळकर | Published: May 25, 2023 1:29 PM

एक तर नावातला ‘ वैधानिक’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे या मंडळांचे गांभीर्य कमी झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वैधानिक विकास मंडळासह राज्यातील मागास भागांसाठी सुरू करण्यात आलेली वैधानिक विकास मंडळे अद्यापही मृतावस्थेत आहेत. त्यांना मुदतवाढीची शक्यता धूसर होत चालली असल्याने ही मंडळे नजीकच्या काळात गुंडाळली जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे.

एक तर नावातला ‘ वैधानिक’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे या मंडळांचे गांभीर्य कमी झाले आहे. नवीन सरकार आल्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. परंतु तेव्हापासून ते आतापर्यंत यासंदर्भात काही ठोस हालचाल झालेली नाही. केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेऊन त्यात या मंडळांना मुदतवाढ देण्याची मंजुरी दिली तरच ही मंडळे कार्यान्वित होतील. पण तशी शक्यता सध्या तरी अजिबात दिसत नाही. कारण यासाठी ना राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, ना केंद्र सरकारमधील मराठवाड्याचे मंत्री काही करीत आहेत?

आयएएस दर्जाचा अधिकारी दिवसभर बसून राहतो...जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे कार्यालय आहे. या मंडळाचे सचिवपद आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आहे. सध्या विजयकुमार फड हे या पदावर आहेत. फड हे हभप आहेत. कीर्तन हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त असताना त्यांना आयएएस हा दर्जा मिळाला. त्यानंतर ते धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदलून गेले. तेथील त्यांचा कार्यकाळ अल्प राहिला. नंतर ते मराठवाडा वैधानिक विकास मंडळात आले. तेथे अत्यंत अपुरा कर्मचारी वर्ग व निधीअभावी कोणतीच कामे सुरू नसल्याने फड यांच्यासारख्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला कार्यालयात नुसते बसून राहावे लागते. ‘हे काय, काहीच काम नाही. ज्ञानेश्वरी वाचत बसलोय’, असे एकदा फड म्हणाले होते. आताही त्यांना या प्रतिनिधीने विचारले असता ते म्हणाले, ‘मुदतवाढीबद्दल अधिकृतपणे आम्हाला काहीही कळवलेले नाही. कार्यालयात यायचं आणि बसून राहायचं. दुसरं कुठलंच काम नाही.’

ना जनता विकास परिषद आक्रमक ना मराठवाडा मुक्ती मोर्चासंविधानातल्या ३७० व्या कलमानुसार मागास भागांच्या विकासाचा आग्रह धरत गोविंदभाई श्रॉफ व विजयेंद्र काबरा यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींनी वेळोवेळी आंदोलने केली. मराठवाडा जनता विकास परिषदेचे गोविंदभाई श्रॉफ अध्यक्ष असताना त्यांनी या मंडळाच्या स्थापनेसाठी रान उठवले होते. उपोषणे केली होती. तेव्हा त्यांच्यात आणि शंकरराव चव्हाण यांच्यात या मुद्यावरून वाद झाला होता. शंकरराव चव्हाण हे वैधानिक विकास मंडळाच्या बाजूने नव्हते. यामुळे सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण होईल, या मताचे होते. पुढे मंडळे अस्तित्वात आली; पण ती कधीच सक्षमतेने चालली नाहीत. मुदतवाढीचा प्रश्न कायमच राजकीय ठरत गेला. आताही तेच घडत आहे. ज्या गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेचे नेतृत्व केले, ती परिषदही आता प्रभावहीन झाली आहे. गोविंदभाई बोलत होते, तर त्याला महत्त्व असायचे. आता जनता विकास परिषद तेवढी आग्रही व आक्रमक राहिली नाही. मराठवाडा मुक्ती मोर्चा हा राजकीय पक्ष असल्याचा दावा करीत असते. परंतु, या पक्षानेही कधी हा प्रश्न उचलला नाही व लावून धरला नाही. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत होती. ती प्रथा बंद झाली. ती सुरू व्हावी यासाठीही कोणाचे प्रयत्न दिसत नाही.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार