मराठवाड्यातील १५ मंडळांत अतिवृृष्टी
By Admin | Updated: August 6, 2015 01:03 IST2015-08-06T00:34:41+5:302015-08-06T01:03:11+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात ४ आॅगस्टपासून पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसले तरी बीड, उस्मानाबाद आणि लातूर

मराठवाड्यातील १५ मंडळांत अतिवृृष्टी
औरंगाबाद : मराठवाड्यात ४ आॅगस्टपासून पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसले तरी बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांवर वरुणराजा नाराज आहे. तर दुसरीकडे उर्वरित पाच जिल्ह्यांतील १५ मंडळांत ६५ मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
६५ मि. मी. च्या पुढे पाऊस झाल्यास तेथे सरकारी परिभाषेनुसार अतिवृष्टीची नोंद घेतली जाते. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव ७५ मि. मी., अन्वा ७५ मि. मी., धावडा ८० मि. मी., वरुड ६५ मि. मी., परभणी जिल्ह्यातील सावंगी म्हा.७५ मि. मी., बामणी ७० मि. मी. तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ६८ मि. मी., गोरेगाव ९६ मि. मी., सि.बुद्रुक ६७ मि.मी., अजेगाव ८० मि. मी., साखरा ९४ मि. मी., खंडाळा ७२ मि. मी., पानकनेरगाव ९४ मि. मी., हत्ता ८४ मि. मी., हिंगोली ७२ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त २३ मंडळांत ५० मि. मी. च्या पुढे आणि ६५ मि. मी. च्या आत पाऊस झाला आहे. ६ आॅगस्टपर्यंत ही मंडळेदेखील अतिवृष्टीच्या नोंदीत येऊ शकतात.
या मंडळात हिंगोलीतील माळहिवरा ५८ मि. मी., डिग्रस ६४ मि. मी., कळमनुरी ५२ मि. मी., नरसी नामदेव ५२ मि. मी., जालना जिल्ह्यातील सिपोरा बाजार ६१ मि. मी., राजूर ६० मि. मी., केदारखेडा ६० मि. मी., जाफ्राबाद ६३ मि. मी., टेंभूर्णी ६० मि. मी., माहोरा ६४ मि. मी., कुंभारझरी ५७ मि. मी., तळणी ६० मि. मी., भोकरदन ५३ मि. मी., मंठा ५३ मि. मी. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार ६१ मि.मी, पीरबावडा ५५ मि.मी., अंभई ५५ मि.मी., भराडी ५५ मि. मी., गोळेगाव ५४ मि. मी., सोयगाव ५५ मि. मी., सावळदबारा ५८ मि. मी., करंजखेडा ५७ मि. मी., बाजारसावंगी ५९ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
औरंगाबाद : पावसाची आतुरतेने वाट पाहणारे शहरवासीय रिमझिम पावसाने सुखावले आहेत. शहरात दिवसभरात ३६.१० मि. मी. तर जिल्ह्यात ३२.४७ मि. मी. पावसाची नोंद झाली.
४ आॅगस्टची पहाट पाऊस घेऊनच उजाडली. दिवसच नव्हे तर रात्रभर संततधार सुरू होती. बुधवारीही संततधार चालूच होती. मागील दोन दिवसांत शहरवासीयांना सूर्यदर्शन झाले नाही. सतत रिपरिप होत असतानाच अधूनमधून पाऊस थोडा जोर धरत होता. शहर परिसरात सर्वाधिक पाऊस करमाडला ४७ मि.मी. झाला. त्याखालोखाल चिकलठाणा परिसरात ४६ मि. मी., हर्सूल ४३ मि. मी., भावसिंगपुरा ४२ मि. मी., उस्मानपुऱ्यात ३९ मि. मी. , कांचनवाडी ३२ मि. मी., लाडसावंगी ३० मि. मी., चित्तेपिंपळगाव २९ मि. मी., चौका परिसरात १० मि. मी. पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस फुलंब्री ५२.५० मि. मी. झाला तर कमी पाऊस वैजापूर ११ मि. मी. झाला. फुलंब्रीतही वडोद बाजार परिसरात ६१ मि. मी. पावसाची नोंद झाली. पैठण १८.३० मि. मी., सिल्लोड ४५.८८ मि. मी., सोयगाव ४५.६७ मि. मी., गंगापूर ११.७८ मि. मी., कन्नड ३६.६७ मि. मी., तर खुलताबाद तालुक्यात ३४.६७ मि. मी. अशी जिल्ह्यात एकूण ३२.४७ मि. मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस वैजापूर तालुक्यात झाला. त्यातही येथील नागमठाण परिसरात अवघा ३ मि.मी. तर बोरसर व लासूरगाव येथे प्रत्येकी ४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.