शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

सिंचनात पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी साधण्यासाठी मराठवाड्यास १५ वर्षांत ३० हजार कोटींची गरज

By बापू सोळुंके | Updated: March 29, 2023 19:56 IST

आमचं पाणी आमचा हक्क: पुढील दहा वर्षांत मराठवाड्यातील जास्तीत जास्त २५ टक्के क्षेत्रच येईल सिंचनाखाली

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही देशाची प्रगती पाण्याशिवाय होऊच शकत नाही. मराठवाड्यावर निसर्गासोबतच शासनकर्त्यांनीही कायम अन्याय केल्याने मराठवाड्याला ‘दुष्काळवाडा’, ‘टँकरवाडा’ अशा नावांनी ओळखले जाते. मराठवाड्यातील ७६ पैकी ५३ तालुके (७० टक्के ) कमी पावसाच्या क्षेत्रात मोडतात. महाराष्ट्रातील विद्यमान अपूर्ण प्रकल्पांचा अभ्यास केला तर सर्व कामे पुढील १० वर्षांत पूर्ण झाल्यास उर्वरित महाराष्ट्राची सिंचन क्षमता ४१ टक्के आणि विदर्भाची ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. मराठवाड्यातील उपलब्ध पाणी आणि उर्वरित प्रकल्प पाहता, सर्वांत कमी केवळ २५ टक्के सिंचनापर्यंत पोहोचू शकते. उर्वरित महाराष्ट्राच्या सिंचनाची बरोबरी करण्यासाठी मराठवाड्यासाठी इतर पाणी समृद्ध क्षेत्रातूनच १५० टीएमसी पाणी आयात करावे लागेल. त्यासाठी नवीन सिंचन प्रकल्प प्रस्तावित करावे लागतील. ही प्रकल्प करण्यासाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल.

कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी डिसेंबरनंतर पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडतात. यामुळे २०१९ पर्यंत मराठवाड्यातील शेकडो गावांतील जनतेला जानेवारी ते जूनपर्यंत चार ते पाच हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, गेली दोन ते तीन वर्षे मुबलक पाऊस होत असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाईच्या झळा सध्या जाणवत नाही. असे असले तरी ही परिस्थिती केवळ लहरी निसर्गावर अवलंबून आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मराठवाड्याला कायमस्वरूपी पाण्याची गरज आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या समृद्ध पाणी क्षेत्रातून सुमारे १५० टीएमसी पाणी मराठवाड्यात आयात करून आणावे लागेल. यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असल्याचे जलतज्ज्ञ सांगतात.

प. महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावतंत्राचा बळीपिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाच्या बाबतीतही मराठवाडा अन्य प्रातांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. केवळ राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावातंत्राचे राजकारण यास प्रमुख कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

मराठवाड्यातील ५६ लाख हेक्टरसाठी केवळ ८ टक्के पाणीसिंचनाच्या बाबतीत मराठवाड्याची उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांची तुलना केली तर मराठवाड्यावर मागील ६२ वर्षांत कायम अन्याय होत असल्याचे दिसते. परिणामी, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष वाढतच आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील पेरणीलायक ९७.६० लाख हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी ७४ टक्के पाणी उपलब्ध आहे, तर विदर्भातील ५६.७४ लाख हेक्टर (२७ टक्के) क्षेत्रासाठी १८ टक्के पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यातील ५६.२८ लाख हेक्टर (२७ टक्के) क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी उपलब्ध आहे.

राज्यात निर्माण झालेली सिंचन क्षमता आणि (कंसात २०३५ पर्यंत टक्केवारी)उर्वरित मराठवाडा - ३० टक्के (४१.८ टक्के)विदर्भ - २३.२ टक्के (३९.१ टक्के)मराठवाडा - २०.९ टक्के (२५.६ टक्के)

 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद