शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय; ध्वजारोहणानंतर शिवसेनेने पुन्हा केले अभिवादन

By सुमेध उघडे | Updated: September 17, 2022 13:40 IST

Marathwada Muktisangram Din: दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यातून लवकर गेले

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हैदराबाद येथे जाण्यासाठी वर्षानुवर्ष ठरलेली कार्यक्रमाची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलली. दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे लागलीच तिकडे, त्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शिवसेनेकडून सकाळी ९ वाजता पुन्हा अभिवादन कार्यक्रम घेतला. (Marathwada Muktisangram Din )

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यान येथील शहीद स्तंभास सकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. दरवर्षी अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता होतो, मात्र हैदराबाद येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमास जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ १५ मिनिटांत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला, अशी टीका शिवसेनेकडून होत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम झाला नाही. त्यांना महाराष्ट्र, मराठवाडयापेक्षा हैद्राबाद प्रिय आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. मुख्यमंत्री येथील कार्यक्रम करून हैदराबादला जाऊ शकले असते. मात्र, दिल्लीची मर्जी राखण्यासाठी कार्यक्रमाची वेळ बदलून ते हैदराबादकडे रवाना झाले, असेही दानवे म्हणाले.   

हा मराठवाड्याचा अपमान दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार होतो. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यानी मराठवाड्यातील जनतेचा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदे