मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम अधांतरी
By Admin | Updated: June 27, 2014 01:04 IST2014-06-27T00:53:05+5:302014-06-27T01:04:31+5:30
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम अधांतरी आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम अधांतरी
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम अधांतरी आहे.
१५ आॅगस्टपर्यंत ते काम पूर्ण करण्याची डेडलाईन प्रशासनाला आज तिसऱ्यांदा देण्यात आली. मात्र, त्या तारखेपर्यंत काम होण्याची सध्या तरी शक्यता नाही.
शिवाय संग्रहालयाच्या कामासाठी करण्यात आलेली १ कोटी रुपयांची तरतूदही अजून कागदावरच असल्यामुळे कामाला हवी ती गती मिळत नसल्याचे दिसते.
महापौर कला ओझा यांनी आज सिद्धार्थ उद्यानातील संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, उपअभियंता के.आर. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. (लोकमत ब्युरो)
सत्ताधाऱ्यांचे आदेश असे-
मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाबाबत तपशीलवार माहिती द्यावी. प्रकल्प पूर्ण होण्यात अडचणी काय आहेत, १५ आॅगस्टपर्यंत काम पूर्ण करावे. काम किती बाकी आहे, त्याची माहिती द्यावी.
१ कोटी रुपयांची वाढीव तरतूद करावी, असे आदेश सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला आज दिले.