शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा येतोय टंचाईच्या विळख्यात, १०० मि.मी.पावसाची तूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 13:31 IST

लहान-मोठ्या सर्व ८७७ प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा सध्या आहे. ९८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ५७ गावांमध्ये ८४ टँकर्सने

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि नाशिक विभाग टंचाईच्या विळख्यात येण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत अलनिनोच्या प्रभावामुळे १०० कोटींचा टंचाई आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. मात्र, आता त्यात ५० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. १५० कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा असेल.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विभागाच्या जलसाठ्यांसह चारा व इतर उपलब्धततेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यानंतर बुधवारी विभागीय आयुक्तांनी ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेतली. विभागात पर्जन्यमानाची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर होणारे परिणाम तपासावेत. त्यासाठी मंडळनिहाय तपासण्या कराव्यात, चाऱ्याच्या उपलब्धतेचे नियोजन करून ठेवावे. जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसी देण्याच्या सूचना बुधवारी विभागीय आयुक्तांनी केल्या

५१ दिवस कोरडे२३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात ५४ टक्के पाऊस झाला आहे. ४६३ मि.मी. म्हणजे ७५ टक्के पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. १०० मि.मी.पावसाची तूट सध्या विभागात आहे. ४६८ पैकी १६९ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. ८४ पैकी सरासरी ५१ दिवस कोरडे गेले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिला खंड सरासरी १५ दिवसांचा, दुसरा खंड १८ दिवसांचा, तिसरा १६ तर चौथा खंड ९ दिवसांचा राहिला आहे. ३६ मंडळांत २५ टक्के, २०६ मंडळांत ५० टक्के, १४२ मंडळांत ७५ तर फक्त ८४ मंडळांत १०० टक्के पाऊस आजवर झाला आहे. लहान-मोठ्या सर्व ८७७ प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा सध्या आहे. ९८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ५७ गावांमध्ये ८४ टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.

कमी पाऊस झाल्याने चिंता....मराठवाडा विभागात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झाले आहे. आतापर्यंतच्या पावसाळ्यात ५१ दिवस कोरडे राहिलेले आहेत. पावसाने अधिक ओढ दिल्यास पर्यायी उपाययोजनांसाठी नियोजन, पीक नुकसानीचे पंचनामे, लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कामे करावीत.-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी