शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

By विकास राऊत | Updated: March 13, 2024 12:36 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टँकरचा आकडा ४५० पार गेला आहे. विभागाला पाणीटंचाईचे चटके जाणवत असून, तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढू लागली आहे. मार्चअखेर ५०० पर्यंत टँकरचा आकडा जाणे शक्य आहे. 

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवत असून, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव हे जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत. १५ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील मिळून एकूण १९७ गावे, ५८ वाड्यांना ३१९ टँकरद्वारे पाणी केला जात होता, तर सध्या लातूरसह या जिल्ह्यातील एकूण २७६ गावे, ७८ वाड्यांना ४५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुका टँकरमुक्त असून, उर्वरित तालुक्यातील एकूण १०५ गावे व ३९ वाड्यांतील ग्रामस्थांना १७८ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. भोकरदन तालुक्यात ४३ टँकर सुरू आहेत, तर जालना तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या ४०च्या घरात आहे, तर बीड तालुक्यातील गेवराई तालुक्यातील १ गाव ३ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

जिल्ह्यात २६९ टँकरने पाणी...मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खुलताबाद, सोयगाव हे तालुके वगळता सर्व तालुक्यांत टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात जायकवाडी धरण असताना देखील ३५ गावे व ८ वाड्यांना सध्या ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३८ गावे व १२ वाड्यांना मिळून ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील २० गावे व १ वाड्यांना २६, गंगापूर तालुक्यातील २० गावे व ४ वाड्यांना मिळून ५१ टँकरद्वारे तसेच वैजापूर तालुक्यातील २८ गाव व ४ वाड्यांना एकूण ३७ टँकरद्वारे, कन्नड मधील सात तहानलेल्या गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील २१ गावे व ७ वाड्यांना मिळून ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी जिल्ह्यांतील एकूण १६९ गावे व ३६ वाड्यांना २६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद