शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

मराठवाड्याचे घोडे अडले ४० टक्क्यांवर; विकास कामांसाठीचे ६० टक्के अनुदान बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:06 IST

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी २०२४-२५ साठी ३ हजार ४९० कोटींपैकी ४० टक्के, म्हणजेच १३९५ कोटी रुपये वितरित झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षात सत्ताधाऱ्यांना विकासकामासाठी सहा महिने मिळाले. या काळात जिल्हानिहाय मंजूर आराखड्यातून पालकमंत्र्यांनी वेगाने कामांना मंजुरी दिली. तरीही मराठवाड्याच्या विकासाचे घोडे ४० टक्क्यांच्या पुढे सरकले नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी २०२४-२५ साठी ३ हजार ४९० कोटींपैकी ४० टक्के, म्हणजेच १३९५ कोटी रुपये वितरित झाले आहेत. तत्कालीन पालकमंत्र्यांनी आठही जिल्ह्यांत २ हजार ४२९ कोटींच्या कामांना मंजुरी दिली. ६० टक्के अनुदान शासनाने अद्याप दिलेले नाही. अशातच वर्ष २०२५-२६ च्या नियोजन आराखड्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अजित पवार हे सकाळी १० वाजता विभागाची ऑनलाइन बैठक घेणार आहेत.

तत्पूर्वी, विभागातील काही जिल्ह्यांची नियोजन समितीची बैठक पालकमंत्री घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरची बैठक ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

जिल्हा.................... तरतूद.............. कामांना दिलेली मंजुरीछत्रपती संभाजीनगर... ६६० कोटी ......................... ५०८ कोटीजालना.................. ३९० कोटी ....................... २४२ कोटीपरभणी................ ३४५ कोटी ............................१३० कोटीनांदेड....................५२५ कोटी.........................४४४ कोटीबीड................४८४ कोटी ...........................४१६ कोटीलातूर..................४०१ कोटी ......................३२७ कोटीधाराशिव...............४०८ कोटी.......................१३५ कोटीहिंगोली...............२७७ कोटी.........................२२५ कोटीएकूण...............३४९० कोटी ..........................२४२९ कोटी(डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत खर्च)

४४०० कोटींची तरतूद शक्यशासनाने आजवर ३ हजार ४९० कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीच्या तुलनेत १३९५ कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. २ हजार ९५ कोटींचे अनुदान शासनाने अद्याप दिलेले नाही. सुमारे ६० टक्के अनुदान येणे बाकी आहे. विभागासाठी वर्ष २०२५-२६ साठी ४४०० कोटी रुपयांची तरतूद होईल, अशी चर्चा आहे. विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरचे लोकसंख्येच्या तुलनेत शहरी नागरीकरण वाढल्यामुळे १२०० कोटींचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार