शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मराठवाडा विकास मंडळ करणार औरंगाबादसाठीच्या जलवाहिनीचा ‘डीपीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:47 IST

साधारणपणे ३५० ते ४०० कोटींचा खर्चाचा तो अहवाल असेल. 

ठळक मुद्देमनपाकडे काम नको ४०० कोेटींच्या खर्चाचा प्रकल्प

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत राष्ट्रीय  पेयजल योजनेंतर्गत शहरासाठी जलवाहिनी टाकण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेतले असून, तीन दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार आहे. साधारणपणे ३५० ते ४०० कोटींचा खर्चाचा तो अहवाल असेल. 

मराठवाड्यातील विविध प्रश्नांबाबत गुरुवारी मराठवाडा विकास मंडळातर्फे जिल्हाधिकारी नियोजन समिती सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शहर पाणीपुरवठा योजनेप्रकरणी चर्चा झाली. समांतर जलवाहिनीचे पुनरुज्जीवन करण्याबाबत मनपाला अजून यश आलेले नाही, तसेच ती योजना पुन्हा सुरू करणे आर्थिकदृष्ट्या मनपाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी मनपाने शासनाला साकडे घातले आहे. याच कारणामुळे एमजीपीकडून डीपीआर करून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्राधिकरणाकडे काम दिल्यास ते मंडळामार्फत करून घेण्यात येणार आहे. महापालिकेकडे अनामत म्हणून असलेल्या सुमारे २५० कोटी रुपयांतून शहरातील वितरण व्यवस्थेसाठी हायड्रोक्लोरिक मॅपनुसार काम करण्यात यावे, मुख्य जलवाहिनी एमजीपी आणि विकास मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. असा प्रस्ताव घेऊन मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे व इतर सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

डॉ. कराड म्हणाले, मनपाकडे जे अनुदान आहे, त्यात त्यांनी शहरातील वितरण व्यवस्थेचे काम करावे.दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, शहराच्या पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने शासन जर एमजीपी आणि विकास मंडळामार्फत निर्णय घेणार असेल, तर त्याचे स्वागतच आहे. जलवाहिनी टाकण्याचा मार्ग मोकळा व्हावा, हीच अपेक्षा आहे. काम कुठल्याही यंत्रणेकडून होवो, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा असे वाटते. 

३० वर्षांचे नियोजन करणार३० वर्षांसाठी दोन योजना डीपीआरमध्ये प्रस्तावित करण्यात येणार आहेत. २०५० पर्यंत शहराला लागणाऱ्या पाण्याची गरज समोर ठेवून किती प्रमाणात पाणी उपसा करावा लागेल, याचा अंदाज सदरील डीपीआरमध्ये बांधण्यात येणार आहे. किती व्यासाची जलवाहिनी टाकण्यात यावी, उपसा योजना किती क्षमतेची असावी, कोणत्या प्रकारची जलवाहिनी वापरावी, तसेच ते काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल. त्या कामावर किती रुपयांचा खर्च होईल. शासन ती रक्कम कशी उपलब्ध करून देऊ शकेल, आदी बाबींचा डीपीआरमध्ये समावेश असेल.

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाgovernment schemeसरकारी योजना