मराठी भाषा गौरवदिन बसस्थानकातही साजरा होणार
By Admin | Updated: February 27, 2016 00:14 IST2016-02-27T00:06:41+5:302016-02-27T00:14:03+5:30
हिंगोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत २७ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येणार आहे.

मराठी भाषा गौरवदिन बसस्थानकातही साजरा होणार
हिंगोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत २७ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने हिंगोली येथील बसस्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्यातील कविवर्य कुसमाग्रज ऊर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्राद्वारे सर्व आगारप्रमुखांना कळविले आहे. बसस्थानकावर कवी कुसुमाग्रजांसह अन्य मान्वरांच्या कवितांच्या फलकाचे अनावरण केले जाणार आहे. कार्यक्रमास प्रवाशी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोलीचे आगारप्रमुख आर. वाय.मुपडे व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)