शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : औरंगाबादमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 17:06 IST

Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेतमराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर ) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रोडवरील कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतली होती.

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलनाने आज आक्रमक स्वरूप घेतले. आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद - नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यांना काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता सुरु करण्यात झाली. प्रथमतः या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. यानंतर आंदोलकांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली.यावेळी त्यांची या ठिकाणी तैनात तैनात पोलिसांसोबत वादावादी झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला,यातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे याने नदी पात्रात उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित जमावाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाहजोरात असल्याने काकासाहेब हे जवळपास 200 मीटर अंतरावर वाहत गेले.  ग्रामरक्षक दलाचे दशरथ बिरुटे यांनी त्याला प्रवाहातून काढून काठावर नेले. यानंतर त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती गंगापूर तालुक्यात वाऱ्यासारखी बाजारपेठ बंद करण्यात आली. तसेच आंदोलकांनी नगर रोडवर रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे. नगर रोडवर मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी रास्तारोको केले असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

निवेदन देऊन दिला होता इशारा गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी   मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी (दि. २३ ) कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादmarathaमराठा