शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : विष प्यायलेल्या मराठा आंदोलकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 10:55 IST

औरंगाबादमधील देवगाव रंगारी येथे आंदोलनादरम्यान आंदोलकानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चानं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मराठवाड्यात हिंसक वळण लागले होते. यादरम्यान, जगन्नाथ सोनावणे (वय 55 वर्ष) या आंदोलकानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील देवगाव रंगारी येथे आंदोलनादरम्यान सोनावणे यांनी लासूर टी पॉइंटवर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (24 जुलै) सकाळी 10.30 वाजता घडली.  यानंतर तातडीनं जगन्नाथ यांना देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी सहा आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

Mumbai Bandh: ठाण्यात 'रेल रोको', शेकडो मराठा आंदोलक ट्रॅकवर )

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.  सोमवारी (23 जुलै) कायगाव टोका येथे आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (24 जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली. दरम्यान, बंदला जिल्ह्यात हिंसक वळण मिळाले. कन्नड तालुक्यात एका तरुणाने नदी पात्रात उडी मारली, तर एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कायगाव टोका येथे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शहर व परिसरात वाहनांचे दोन शोरूम तसेच पाच रिक्षांवर दगडफेकीचे प्रकार घडले. खासदार खैरे, आमदार झांबड यांना धक्काबुक्की झाली, तर क्रांतीचौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ यांनाही पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMumbai Bandhमुंबई बंदmarathaमराठाreservationआरक्षण