मराठा समाजाला काहीही मिळालं नाही: विनोद पाटील यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:04 IST2021-06-09T04:04:41+5:302021-06-09T04:04:41+5:30

त्यांनी सांगितले की, कालपासून राज्यात चित्र रंगवलं गेलं की, भेट फक्त मराठा आरक्षणासाठी आहे, मात्र असं काही घडलं नाही. ...

Maratha community got nothing: Vinod Patil's grief | मराठा समाजाला काहीही मिळालं नाही: विनोद पाटील यांची खंत

मराठा समाजाला काहीही मिळालं नाही: विनोद पाटील यांची खंत

त्यांनी सांगितले की, कालपासून राज्यात चित्र रंगवलं गेलं की, भेट फक्त मराठा आरक्षणासाठी आहे, मात्र असं काही घडलं नाही. आम्हाला फक्त आशा दाखवण्यात आली. आम्हाला वाटलं, आज जबाबदारी निश्चित होईल, मात्र असं काहीच झालं नाही. साधं आश्वासन सुद्धा मिळालं नाही.

आरक्षण मुद्दा अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता. मात्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो, असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये.

आम्ही उद्विग्न झालो, समाज रस्त्यावर आला की काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न सरकार करते. आजचा प्रकारही तसलाच आहे, बैठक संपेपर्यंत भाबडी आशा होती, आम्हाला वाटत होतं काहीतरी होईल, मात्र सरकारने काहीही सांगितलं नाही वा स्पष्ट केलं नाही. त्यामुळं पुन्हा शून्य अशी अवस्था झाली, सरकारने आता त्यांच्या हातात जे आहे ते समाजाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, असा आग्रह विनोद पाटील यांनी धरला आहे.

Web Title: Maratha community got nothing: Vinod Patil's grief