मराठा सेनेचा जिल्हा कचेरीवर दप्तर मोर्चा धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:01 IST2016-02-26T23:57:26+5:302016-02-27T00:01:43+5:30
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मराठा सेना व मराठा संघटनांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा दप्तर मोर्चा काढण्यात आला.

मराठा सेनेचा जिल्हा कचेरीवर दप्तर मोर्चा धडकला
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मराठा सेना व मराठा संघटनांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा दप्तर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
मराठवाड्यातील मराठा समाजास मूळ ओबीसी आरक्षणामध्ये विदर्भातील कुणबी मराठा या आरक्षणाप्रमाणे आरक्षण देण्यात यावे. आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ईएसबीसी म्हणून दिलेले आरक्षण विधानसभेत पुन्हा विधेयक पास करुन हा कायदा राज्यघटनेच्या नव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी रुपयांचा निधी विनाविलंब द्यावा, तसेच खुल्या प्रवर्गातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावेत किंवा त्यासाठी शासनाने विशेष तरतूद करावी,आदी मागण्या केल्या आहेत.
सदर मोर्चा मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. त्यात मराठवाडा अध्यक्ष दत्ता तळणीकर, जिल्हाध्यक्ष पंडित हंबर्डे, जीवन चव्हाण, माधव शिंदे, गांधी मोरे, सचिन शिंदे, गणेश पवळे, मनोज मोरे, साईनाथ फाजगे,भगवान आढाव यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
मराठा आरक्षण मोर्चास महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरिषभाऊ जाधव, महाराष्ट्रीयन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव सोळंके, छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन कहाळेकर, मराठा महासंग्रामचे संजय चव्हाण, छावाचे स्वप्नील इंगळे, कुणबी-मराठा महासंघांचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, शिवक्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पा. पुणेगावकर, संभाजी ब्रिगेडचे स्वप्निल जाधव, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, माधव देवसरकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ. रेखाताई चव्हाण, मानिनी महिला संघटना कल्पनाताई देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, जि. प. सदस्य बाजीराव भालेराव, दिगंबर क्षीरसागर, विलास घोरबांड, गंजान भांगे, स्वप्निल हंगळे आदी संघटनांनी पाठिंबा दिला.
(प्रतिनिधी)