शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मंजूरपुरा ते रोशनगेट रस्ता रुंदीकरणासाठी मार्किंग सुरू; ४०० पेक्षा अधिक मालमत्ता होणार बाधित

By मुजीब देवणीकर | Updated: February 29, 2024 17:59 IST

मिशन रस्ते रुंदीकरण! सात वर्षांपूर्वी रस्ता मोकळा करण्यासाठी मनपाकडून मार्किंग करण्यात आली होती. 

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहराची लाइफलाइन अशी ओळख असलेल्या मंजूरपुरा ते रोशनगेटपर्यंत रस्ता ५० मीटर रुंद करण्यासाठी बुधवारपासून मनपाने कारवाई सुरू केले. पहिल्या दिवशी मंजुरपुरा येथून मार्किंगला सुरुवात झाली. प्रशासक जी. श्रीकांत यांनी मार्किंगची पाहणी केली. या रस्त्यात ४०० पेक्षा अधिक मालमत्ता बाधित होणार आहेत. मालमत्ताधारकांना १९९९ मध्ये मोबदलासुद्धा देण्यात आला आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी जुन्या विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. विश्रांतीनगर येथील ८० फूट रुंद रस्ता मोकळा केल्यानंतर प्रशासनाने मिशन रस्ते रुंदीकरणाला सुरुवात केली. चार दिवसांपूर्वीच मंजूरपुरा ते रोशनगेट रस्त्यावर मार्किंग करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. त्यानुसार सकाळी अतिक्रमण हटाव विभाग, नगररचना विभाग आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. मंजूरपुरा चौकापासून डाव्या आणि उजव्या बाजूला मार्किंग करण्यात आली. काही ठिकाणी पाच ते दहा फूट मालमत्ता बाधित होत आहेत. दोन्हीकडे परिस्थिती एकसारखीच आहे. 

विकास आराखड्यात हा रस्ता १५ मीटर दर्शविण्यात आला. त्यानुसार १९९६ ते १९९९ पर्यंत भूसंपादन केले. मालमत्ताधारकांना मोबदलासुद्धा दिला. पण, जागेचा ताबाच घेतला नाही. त्यामुळे मालमत्ताधारक तेथेच होते. सात वर्षांपूर्वी रस्ता मोकळा करण्यासाठी मनपाकडून मार्किंग करण्यात आली होती. नागरिकांचा विरोध झाल्यामुळे रस्ता रुंद झाला नाही. रुंदीकरणानंतर स्मार्ट सिटीच्या निधीतून हा सिमेंटचा रस्ता तयार होईल.

दोन दिवस चाललेले मार्किंगबुधवारी दिवसभरात मंजूरपुऱ्यापासून पुढे ‘टोटी की मशीद’ त्यानंतर चेलीपुरा पोलिस चौकीच्या पुढे ‘मुरमुरे की मशीद’पासून थोडे पुढे मार्किंग केली. उर्वरित मार्किंग गुरुवारी केली जाणार आहे. यावेळी नगररचना विभागाचे अभियंता पूजा भाेगे, अतिक्रमण हटाव विभागाचे सय्यद जमशेद उपस्थित होते.

प्रशासकांनी केली कामाची पाहणीप्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी मंजूरपुरा भागात मार्किंगची पाहणी केली. सोबत अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपस्थित होते. जागेचा मोबदला मिळाला असल्याने नागरिकांनी कोणताही विरोध केला नाही.

रोशनगेट ते कटकटगेटरोशनगेट ते कटकटगेट हा विकास आराखड्यातील रस्ताही बराच अरुंद आहे. हा रस्ता रुंद करावा, यासंदर्भात खंडपीठानेही आदेश दिले. मनपाने दोन वेळेस मार्किंगचा प्रयत्न केला. विरोधामुळे मनपाला परत यावे लागले. या रस्त्यासंदर्भातही प्रशासन विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण