शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

केबीसीच्या कचाट्यात अनेक गावे सापडली

By admin | Updated: July 24, 2014 00:28 IST

इलियास शेख, कळमनुरी शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात केबीसीने आपले जाळे तयार केले होते. कमी कालावधीत दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गावे केबीसीच्या कचाट्यात सापडली आहेत.

इलियास शेख, कळमनुरी
शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात केबीसीने आपले जाळे तयार केले होते. कमी कालावधीत दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गावे केबीसीच्या कचाट्यात सापडली आहेत.
मागील चार वर्षांपासून केबीसीने ग्रामीण भागात आपले जाळे निर्माण केले. अडीच वर्षांत १७ हजार २०० रुपयांचे ५१ हजार रुपये देण्याचे आमिष कंपनीने गुंतवणूकदारांना दिले होते. एजंटाचे जाळे तयार केल्याने एजटांनी गावोगाव पिंजून काढून अनेकांना रक्कमा गुंतविण्यास सांगितले. आमिषाला बळी पडून अनेकांनी सोने, जवळील मालमत्ता, शेती विकून केबीसात पैसे गुंतवले. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने परतावा दिला. त्यामुळे सहजपणे सर्वांचाच विश्वास बसला. लखपती होण्याची भुरळ एजंट गुंतवणूकदारांना घालत होते. एजंटाच्या अलीशान गाड्या, त्यांची स्टाईल यामुळे सर्व सामान्यांना भुरळ पडली. तालुक्यातील एकाने ५० लाख रुपये रोख केबीसीत गुंतवल्याची चर्चा आहे. हा व्यक्ती कोण? याची चौकशी पोलिस करीत आहेत. येथील मुरलीधर गायकवाड यांनी केबीसीत २ लाख ६ हजार ८०० गुंतवले आहेत. तालुक्यात २० ते २५ एजंट असून यात १० कोटीच्याजवळपास गुंतवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. लवकर श्रीमंत होण्याच्या लालसेने एजंटांनी आपले सगेसोयरे, नातेवाईक, मित्र आदींना केबीसीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एजंट जवळचाच असल्याने कोणीही पोलिसांत तक्रार द्यायला तयार होत नाही. येथील पोलिस ठाण्यात एकही तक्रार दाखल झालेली नाही. केबीसीत किती रक्कम गुंतवली? हे सांगण्यास कोणीही तयार नाही. तालुक्यात कळमनुरी शहरासह आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा, वाकोडी, खापरखेडा, सालवाडी, मसोड, सालेगाव, रुपूर, नांदापूर, गौळबाजार या गावांसह अनेक गावे केबीसीबाधीत झाली आहेत. सगळीकडे केबीसीचीच चर्चा आहे. कोणी किती रक्कमा गुंतवल्या? याचे रेकॉर्ड नसल्याने काहीही सांगता येणे कठीण आहे. केबीसीच्या गाड्या रस्त्यावर फिरत होत्या. आता त्याही फिरणे बंद झाल्या आहेत. अनेकजण रक्कमा गुंतवून ‘तेरी भी चुप अन् मेरी भी चुप’ या म्हणीप्रमाणे घरी शांत बसले आहेत. एजंट व गुंतवणूकदार किती? तसेच किती रक्कम यात गुंतवल्या गेली? हे सांगणे सध्यातरी सांगणे कठीण आहे.