चुकीच्या पत्त्यामुळे अनेक विद्यार्थी " टिईटि " परीक्षेस मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 14:01 IST2017-07-22T14:01:46+5:302017-07-22T14:01:46+5:30

ऐन वेळी मिळालेल्या या माहितीने बदलेल्या केंद्रावर पोहण्यास विद्यार्थ्यांना उशिर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

Many students missed the "Titan" exam due to wrong address | चुकीच्या पत्त्यामुळे अनेक विद्यार्थी " टिईटि " परीक्षेस मुकले

चुकीच्या पत्त्यामुळे अनेक विद्यार्थी " टिईटि " परीक्षेस मुकले

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद : शहरातील  अनेक केंद्रांवर आज " टिईटि " परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. हॉल तिकीटवरील पत्त्यानुसार वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा केंद्रावर वेगळाच अनुभव आला. संबंधित केंद्राकडून तुमचा नंबर येथे नसून दुसरीकडे असल्याचे सांगण्यात आले. ऐन वेळी मिळालेल्या या माहितीने बदलेल्या केंद्रावर  पोहण्यास विद्यार्थ्यांना उशिर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. 

मोठ्या आशेने " टिईटि " परीक्षा देण्यास आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना ऐन वेळी परीक्षा केंद्र हे नसून दुसरे आहे हे कळले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. धडपडकरून बदलेल्या केंद्रावर पोहचलेल्या या विद्यार्थ्यांना मात्र त्या केंद्रात वेळेवर पोहचता आले नाही. विलंबामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. या सर्व प्रकारात नाहक अनेक विद्यार्थी परीक्षेस मुकले आहेत. 
 

Web Title: Many students missed the "Titan" exam due to wrong address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.