शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अशोक विजयादशमीनिमित्त बुद्धलेणीवर भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 13:22 IST

अशोक विजयादशमीनिमित्त आज (दि.१८) बुद्धलेणीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : अशोक विजयादशमीनिमित्त आज (दि.१८) बुद्धलेणीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यात परित्राणपाठ, ध्वजारोहण, मंगलमैत्री, धम्मदेसनासह सायंकाळी चार वाजता शहरातील मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाची बुद्धलेणीवर जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्धलेणी धम्मभूमीवर ६३ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी शहरातील शासकीय, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत.  विजयादशमी महोत्सवाचे अध्यक्ष विशुद्धानंद बोधी महाथेरो, तर प्रमुख अतिथी म्हणून सूर्यकांता गाडे, स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँकेचे संचालक तथा आरपीआयचे शहराध्यक्ष विजय मगरे, तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. डी. व्ही. खिल्लारे आहेत.

विजयादशमीदिनी पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत परित्राणपाठ, ७ वाजता धम्मध्वजारोहण, ८ वाजता भिक्खू संघाकडून परित्राणपाठ, ११ वाजता भिक्खू संघाला भोजनदान, दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. दुपारी १२ ते ३ या दरम्यान प्रवचन व भीमगीतांचा कार्यक्रम, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत व भाषणे होतील.  सायंकाळी ६ ते रात्री १० वाजता राजाभाऊ सिरसाठ आणि पंचशीला भालेराव यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम व  भिक्खंूचे प्रवचन होणार आहे. बुद्धलेणीच्या धम्मभूमीत येणारे उपासक आणि उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

या महोत्सवाला भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदन्त नागसेन बोधी थेरो, भदन्त चंद्रबोधी, भदन्त संघप्रिय, भदन्त शीलबोधी, भदन्त पद्मपाणी, भदन्त आर. आनंद, भदन्त विमल कीर्ती, भदन्त संबोधी, भदन्त सुमनश्री, भदन्त उपाली, भदन्त महानामस आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.बौद्ध उपासक -उपासिकांसाठी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त, बससेवा, पाण्याची व्यवस्था, तसेच विविध पक्ष संघटनांच्या वतीने अन्नदानाचे आयोजन केले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad caveऔरंगाबाद लेणीDasaraदसरा