नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडविले
By Admin | Updated: November 17, 2015 00:34 IST2015-11-17T00:26:20+5:302015-11-17T00:34:25+5:30
औरंगाबाद : विदेशात एक ते पावणेदोन लाख रुपये महिन्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबईतील ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट (जीसीएम) या एजन्सीने औरंगाबादेतील सुमारे शंभरहून

नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडविले
औरंगाबाद : विदेशात एक ते पावणेदोन लाख रुपये महिन्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबईतील ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट (जीसीएम) या एजन्सीने औरंगाबादेतील सुमारे शंभरहून अधिक जणांकडून प्रत्येकी ५० हजार ते ७५ हजार रुपये उकळून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी आपल्या पालकांसह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची कारवाई उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुरू होती.
जीसीएम या कंपनीने औरंगाबादेतील उस्मानपुरा परिसरात कार्यालय थाटून कंपनीतर्फे कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये स्टोअर मॅनेजर, रोखपाल, प्लंबर, वेटर, हाऊस कीपिंग स्टाफ, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन इ. पदांसाठी एक लाख ते पावणेदोन लाख रुपये दरमहा पगार असलेल्या नोकरीची जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून सय्यद जफर सय्यद इसाक (५०, रा. न्यू एस. टी. कॉलनी, कटकटगेट) यांनी आपल्या मुलासह कंपनीचे कार्यालय गाठले. कंपनीच्या व्यवस्थापक नेहा पाटील यांनी त्यांना सांगितले की, व्हिसा, विमानाचे तिकीट आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये भरावे लागतील. यातील ५० हजार रुपये भरल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. उर्वरित रक्कम व्हिसा मिळाल्यावर द्यावी लागेल. नेहा पाटील यांनी सय्यद जफर यांची कंपनीचा मालक वृषभ शहा याच्याशी भेट घालून दिली. वृषभ यानेही कंपनीवर विश्वास बसावा यासाठी ९० दिवसांत व्हिसा न