नकली सोने देऊन अनेकांना गंडविले
By Admin | Updated: April 14, 2015 00:55 IST2015-04-14T00:55:47+5:302015-04-14T00:55:47+5:30
वाळूज महानगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून रांजणगावातील किराणा दुकानदाराची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील तिघांना रविवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली होती

नकली सोने देऊन अनेकांना गंडविले
वाळूज महानगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून रांजणगावातील किराणा दुकानदाराची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील तिघांना रविवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली होती. या तिघा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रांजणगाव शेणपुंजी येथील सुनील रमेश गवळी या किराणा दुकानदारास राजस्थान येथील काळूराम असलाराम सोळंकी, पद्माराम सवाजी वाघरी व मुळाराम दोलाराम वाघरी या तिघा भामट्यांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले होते. गवळी यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली होती.
या टोळीला काल पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, फौजदार अजयकुमार पांडे, पोहेकॉ. रमेश सांगळे, संजय रोकडे, सुनील म्हस्के, भगवान जगताप, संतोष लोंढे, बाळासाहेब आंधळे, जनार्दन ठोकळ, सय्यद शकील, अनिल तुपे, तात्याराव शिनगारे आदींच्या पथकाने मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले होते.