स्वस्त धान्यापासून अनेक भूमिहीन कुटुंबे वंचित
By Admin | Updated: July 20, 2014 00:29 IST2014-07-20T00:07:45+5:302014-07-20T00:29:37+5:30
घनसावंगी : तालुक्यातील बोडखा अनेक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे रेशन कार्ड आणि राजीव गांधी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहेत.

स्वस्त धान्यापासून अनेक भूमिहीन कुटुंबे वंचित
घनसावंगी : तालुक्यातील बोडखा अनेक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे रेशन कार्ड आणि राजीव गांधी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहेत. यादीमध्ये एकूण २८ कुटुंबाचे नावच न टाकल्याने हे कुटुंब अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहणार आहेत. अनेक कुटुंबांकडे दारिद्र्यरेषेचे कार्डच नसल्यामुळे गरीब कुंटुंबाला धान्यच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रेशनदुकानदाराने फॉर्म न भरल्याने अनेक गरीब कुटुंबांचे बीपीएल कार्ड बंद झाले आहे. त्यामुळे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना श्रावणबाळ योजनेचे अनुदान मिळण्यास अडचणी येत आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण करून बीपीएलचे कार्ड देण्यात आले. परंतु या सर्व्हेत बऱ्याच कुटुंबांचा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश नाही. यामध्ये समावेश करण्यात आला नाही. अनेक कुटुंबाकडे शेती आहे. त्यांचे उत्पन्न चांगले आहे. असे असूनही त्यांची नावे दारिद्र्यरेषेखाली यादीत आहेत. गावात अनेक कुटुंबं असे आहेत की त्यांच्याकडे ना शेती आहे, ना काही उत्पनाचे साधन तरी त्यांच्याकडे बीपीएलचे कार्ड नाही. पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गरीब नागरिक या कार्डपासून वंचित आहेत. गरीब कुटुंबांना वाटप करण्याची मागणी तहसीलदार अभय चव्हाण याना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर बाबासाहेब ढेरे, पंकज ढेरे, भीमराव घोलप, अप्पासाहेब ढेरे, बळीराम चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांची नावे आहेत. (वार्ताहर)
भूमिहीन वंचित
येथील भूमिहीन मजुरी करणारे नागरिकांकडे बीपीएल सर्व्हेनुसार वगळण्यात आले. ते अनेक वर्षांपासून बीपीएल कार्डपासून वंचित आहेत. अनेक विधवांकडे कार्डच नाही. परिणामी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. नव्याने सर्व्हेक्षण करुन शिधापत्रिका देण्याची मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.