अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
By Admin | Updated: June 12, 2014 01:40 IST2014-06-12T00:59:42+5:302014-06-12T01:40:21+5:30
फकिरा देशमुख , भोकरदन लोकसभा निवडणुकीनंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र आहे.

अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
फकिरा देशमुख , भोकरदन
लोकसभा निवडणुकीनंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात २८ हजार २३८ हजाराचे मताधिक्यामुळे ही निवडणूक मोठी अवघड वाटत असली तरी घराणेशाहीचा मुद्याने जोर धरला तर मात्र चांगलीच चुरशीची होईल. भोकरदन विधानसभा मतदार संघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून विद्यमान आ़ चंद्रकांत दानवे हे प्रमुख उमेदवार आहेत. भाजपाकडून रामेश्वरचे चेअरमन संतोष दानवे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. शिवाय माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जि़प़चे माजी सभापती राजेश चव्हाण, मनीष श्रीवास्तव, सर्जेराव शिंदे हे इच्छुक आहेत. भाजपाकडून बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव थोटे, जि़प़चे माजी सभापती रमेश गव्हाड, बाजार समीतीचे सभापती अरूण वाघ हे इच्छुक असल्याचे समजते.
काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव दळवीसुध्दा सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे केशव पाटील जंजाळ हेसुध्दा एक तरुण उमेदवार इच्छुक आहेत. ही जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने आ़ चंद्रकांत दानवे हेच उमेदवार असतील. लोकसभा निवडणुकीत खा़ रावसाहेब दानवे चौथ्यांदा विजयी झाले.
रावसाहेब दानवे यांच्या रूपाने मतदारसंघाला पहिल्यांदा केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदारसंघात दानवे सांगतील तोच उमेदवार असेल. तरीसुध्दा सर्वांना विश्वासात घेऊन ते संतोष दानवे यांचा पत्ता पुढे करतील. या मतदारसंघात मनसेची ताकद वाढलेली आहे. मनसेकडून जिल्हाध्यक्ष सांडूअण्णा पुंगळे, रावसाहेब भवर , दिलीप वाघ, हे इच्छुक आहेत. समाजावादी पक्ष व बसपा यांच्याकडून या मतदारसंघात उमेदवार शोधण्याचे काम सुरू आहे़ भोकरदन - जाफराबाद तालुक्यात आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
या भागातील रस्त्यांची झालेली दयनीय आवस्था रावसाहेब दानवे व चद्रकांत दानवे यांच्यासाठी सन्मानाची बाब नाही.
दरम्यान, गुत्तेदारीत लोकप्रतिनिधींचे नातेवाईक तसेच कार्यकर्तेच असल्यामुळे या भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली. नवीन रस्ता सुध्दा एक वर्षात उखडल्याचे अनेक उदहरणे आहेत़ मतदारसंघातील मतदाराना रावसाहेब दानवे व चंद्रकांत दानवे यांच्याकडून विकासाच्या खूप अपेक्षा आहेत़
राष्ट्रवादीचंद्रकांत दानवे ६७,४८०
भाजपानिर्मला दानवे ६५,८४१
अपक्ष सर्जेराव शिंदे ११,१६३
इच्छुकांचे नाव पक्ष
चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी
राजेश चव्हाणराष्ट्रवादी काँग्रेस
राजाभाऊ देशमुखराष्ट्रवादी काँग्रेस
सर्जेराव शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस
संतोष दानवेभाजपा
शिवाजीराव थोटेभाजपा
रमेश गव्हाडभाजपा
अरूण वाघभाजपा
सांडूअण्णा पुंगळेमनसे
रावसाहेब भवरमनसे
दिलीप वाघमनसे
लक्ष्मणराव दळवीअपक्ष