मनपात बोंबाबोंब आंदोलन

By Admin | Updated: October 28, 2015 23:38 IST2015-10-28T23:38:15+5:302015-10-28T23:38:15+5:30

लातूर : औसा रोड मित्रमंडळाच्या वतीने लातूर महापालिकेच्या मैदानावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले

Mantap Bombay Babon movement | मनपात बोंबाबोंब आंदोलन

मनपात बोंबाबोंब आंदोलन


लातूर : औसा रोड मित्रमंडळाच्या वतीने लातूर महापालिकेच्या मैदानावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते़ मनपा प्रशासनाचा धिक्कार करीत महापौर, आमदार व प्रशासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ सुमारे एक तास आंदोलन करण्यात आले़
डेंग्यूमुळे औसा रोड परिसरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही महापालिकेच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात नाहीत़ यामुळे औसा रोड मित्र मंडळाचे कार्यक्रम आक्रमक झाले होते़ कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मनपाचे आरोग्य अधिकारी महेश पाटील यांच्यासह सहआयुक्त वसुधा फड यांनीही प्रयत्न केला़ मात्र महापौर जोपर्यंत समोर येणार नाहीत़ तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा पावित्रा कार्यकर्त्यांनी घेतला़ अखेर महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समिती सभापती पप्पू देशमुख, नगरसेवक राजा मणियार, राहुल माकणीकर, विक्रांत गोजमगुंडे, चंद्रकांत चिकटे, शैलेश स्वामी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून साथ रोग नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले़ शहरातील औसा रोड परिसरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने महापौर यांनी या परिसरास भेट देऊन धूर फवारणी व अ‍ॅबेटिंगच्या सूचना दिल्या़ या आंदोलनात प्रशांत पाटील, दिनेश बिदरकर, सुनिल मलवाड, धनंजय भुरके, अजय पाटील, संतोष साळुंके, नामदेव जाधव, मनोज थिटे, संदीप सूर्यवंशी, अजित माने, पुनित पाटील, अमोल जाधव, गजानन हमिदकर, राजू उटगे, नरेंद्र रंदाळे, अनंद गायकवाड आदी सहभागी होती़ (प्रतिनिधी)
लातूर शहरातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१३ मध्ये २ कोटी ५० लाख व नगर विकास विभागाचे १ कोटी २५ लाख रुपये निधी मागील दोन वर्षांपासून महापालिकेकडे पडून आहे़ तरीही दलित वस्त्यांमध्ये कसलीच विकास विषयक कामे मनपाकडून करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ मनपाचे नगरसेवक चंद्रकात चिकटे यांनी बुधवारी मनपाच्या बांधकाम विभागाला टाळे ठोकले़ दलितांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने २०१३ मध्ये २ कोटी ५० लाख आणि नगर विकास विभागाचे १ कोटी २५ लाख महापालिकेकडे मागिल दोन वर्षांपासून पडून आहेत़ तरीही दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोणत्याही वार्डमध्ये कामे केले गेले नाहीत, असा आरोप चंद्रकांत चिकटे यांनी केला. आश्वासन मिळाल्यानंतर टाळे उघडले.

Web Title: Mantap Bombay Babon movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.