मनपाने वसूल केला ७७ हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:49+5:302021-01-13T04:09:49+5:30
मनपा मुख्यालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीत कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी महानगरपालिकेची तयारी सुरु असून लसीकरण ...

मनपाने वसूल केला ७७ हजार दंड
मनपा मुख्यालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीत कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी महानगरपालिकेची तयारी सुरु असून लसीकरण मोहिमेत सहभागी होणारे विविध घटकांचे प्रशिक्षण मंगळवारी महापालिका मुख्यालयात घेण्यात आले. यावेळी डॉ. मनीषा भोंडवे यांनी प्रशिक्षण दिले. याचप्रमाणे दुपारी ४ वाजता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) हॉल, अदालत रोड येथे सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची उपस्थिती होती.
८१९ नागरिकांची कोरोना तपासणी
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवारी शहरात ८१९ नागरिकांची कोरोना तपासणी केली. २१६ नागरिकांची अँटिजन पद्धतीने तपासणी केली असता त्यामध्ये ११ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ६०३ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले.