मांजरा, देव, मानमोडी नद्यांना पूर
By Admin | Updated: October 10, 2016 00:12 IST2016-10-10T00:05:51+5:302016-10-10T00:12:03+5:30
देवणी तालुक्यात गेल्या २४ तासांत ११५.३३ मि.मी. पाऊस झाला असून, या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मांजरा, देव, मानमोडी नद्यांना पूर
देवणी तालुक्यात गेल्या २४ तासांत ११५.३३ मि.मी. पाऊस झाला असून, या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील मांजरा, देव, मानमोडी या नद्यांना पूर आल्याने नदीकाठचे धनेगाव, हेळंब, माटेगडी, जवळगा, टाकळी, लासोना, विजयनगर, बटणपूर, सिंधीकामठ, बोरोळ, गुरधाळ, पंढरपूर, देवणी, हंचनाळ, संगम, वागदरी या गावांतील शेती पिकांना व शेतीस फटका बसला आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहेत. दरम्यान, लासोना, गुरनाळ, देवणी (खु.), सिंधीकामठ, वागदरी, कमालवाडी या गावांचा वारंवार संपर्क तुटत आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने उदगीर तालुक्यातही कहर केला असून, हत्तीबेटावर ११९ मि.मी. पाऊस झाला आहे. या ढगफुटीमुळे देव नदीने रौद्ररुप धारण केले आहे.
(देवनदी कोपली / वृत्त हॅलो २ वर)