माणिक राठोड यांची प्रशिक्षकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:10 IST2017-12-25T01:10:00+5:302017-12-25T01:10:16+5:30

हैदराबाद येथे ३१ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील डॉ. माणिक राठोड यांची महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

Manik Rathore as coach | माणिक राठोड यांची प्रशिक्षकपदी निवड

माणिक राठोड यांची प्रशिक्षकपदी निवड

औरंगाबाद : हैदराबाद येथे ३१ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील डॉ. माणिक राठोड यांची महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र संघाचे शिबीर सातारा जिल्ह्यातील कराड येथे सुरू झाले असून, ते २८ डिसेंबरपर्यंत होणार आहे. या सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा संघ २९ डिसेंबरला मुंबई येथून हैदराबादला रवाना होणार आहे. माणिक राठोड यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्यासह जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष विजय पाथ्रीकर, बाबूराव अतकरे, पुंडलिकराव शेजूळ, ज्ञानदेव मुळे, मधू बक्षी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Web Title: Manik Rathore as coach