शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बाहेरगावाहून येत छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरी; दहशत माजविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 1:49 PM

मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटना सतत घडत असल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : महिलांचे मंगळसूत्र हिसकावून दहशत माजविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकलसह ५ लाख २८ हजारांचे दागिने जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणले.

योगेश सीताराम पाटेकर (२४, रा. स्वामी समर्थनगर, गजानननगर, मूळ रा. गाढे पिंपळगाव, ता. वैजापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचे साथीदार विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. अशोकनगर, श्रीरामपूर), अक्षय त्रिभुवन (रा. वैजापूर) आणि राहुल बरडे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटना सतत घडत असल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली होती. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर, रमाकांत पटारे, कर्मचारी सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, संजय नंद, रवींद्र खरात, सुनील बेलकर, संदीप राशीनकर, महेश उगले, नितीन देशमुख, अजय दहीवाळ, नितेश सुंदर्डे, धनंजय सानप, शुभम वीर, प्राजक्ता वाघमारे, अनिता त्रिभुवन, पूनम पारधी, आरती कुसळे, गीता ढाकणे यांनी तपास करून श्रीरामपूरची टोळी उघड केली. आरोपी चोरी करण्यासाठी नगर जिल्ह्यातून येथे आल्यानंतर योगेशकडे मुक्कामी राहत. 

शहरात त्यांना कोणीही ओळखत नसल्याने ते मंगळसूत्र चोरी करण्यासाठी येताना चेहरा झाकत नव्हते. बिनधास्तपणे ते फिरून सावज शोधत. मंगळसूत्र चोरी केल्यानंतर दिवसभर दुचाकी योगेशच्या घरात लपवून ठेवून आराम करणे आणि रात्र झाल्यानंतर ते दुचाकीसह शहरातून पळून जाणे अशी त्यांची गुन्हा करण्याची पद्धत होते. मागील दीड महिन्यात त्यांनी साथीदारांच्या मदतीने आठ महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. पोलिसांनी योगेशला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली देत त्याने साथीदारांची नावे सांगितली.

आरोपीच्या वाट्याला आलेले दागिने जप्तआरोपी चोरी केल्यानंतर आपसात दागिने वाटून घेत. योगेशच्या वाट्याला आलेले दागिने त्याने श्रीरामपूर येथील एका सोनाराला विक्री केले होते. पोलिसांनी ५ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी अट्टल गुन्हेगारयोगेशविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे, एमआयडीसी वाळूज, पुंडलिकनगर ठाण्यात दोन, तर हर्सूल, एमआयडीसी सिडको आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यात प्रत्येकी एक आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंद आहेत. आरोपी विनोद ऊर्फ खंग्या चव्हाणवर शिर्डी, कोपरगाव, लोणी, राहुरी, श्रीरामपूर शहर, अहमदनगर येथील तोफखाना आणि छत्रपती संभाजीनगरातील विविध पोलिस ठाण्यासह एकूण १९ गुन्हे नोंद आहेत. तर आरोपी आकाशवर शिर्डी व छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ गुन्हे नोंद आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादChain Snatchingसोनसाखळी चोरी