पाटोद्यात दुसऱ्या दिवशीही मंगळसूत्र लांबविले
By Admin | Updated: February 17, 2015 00:37 IST2015-02-17T00:07:56+5:302015-02-17T00:37:49+5:30
पाटोदा (माव) : परतूर तालुक्यातील पाटोदा (माव) येथे सलग दुसऱ्या दिवशीही महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली.

पाटोद्यात दुसऱ्या दिवशीही मंगळसूत्र लांबविले
पाटोदा (माव) : परतूर तालुक्यातील पाटोदा (माव) येथे सलग दुसऱ्या दिवशीही महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, आष्टी पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्त लावला आहे.
रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पाटोदा शिवारात भागित्राबाई सुधाकर वखरे यांच्या गळ्यातील ७ ग्रॅमची सोन्याची पोत चोरट्यांनी हिसकावून नेली होती. चोवीस तासाच्या आत सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पुन्हा अशीच घटना घडली. तारामती प्रभाकर येवले यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. या दोन्ही घटनांप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.