मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात
By Admin | Updated: July 30, 2014 00:47 IST2014-07-29T23:47:51+5:302014-07-30T00:47:15+5:30
मानवत : पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रात ब्रेकडाऊन झाल्याने मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात गेली. डासांनी संधीचा फायदा घेऊन लहान मुले आणि वृद्धांना अक्षरश: हैराण करून सोडले.
मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात
मानवत : पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रात ब्रेकडाऊन झाल्याने मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात गेली. डासांनी संधीचा फायदा घेऊन लहान मुले आणि वृद्धांना अक्षरश: हैराण करून सोडले. मात्र कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने रात्री १२ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.
मानवत शहराला पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रावरून वीज पुरवठा होतो. २८ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पाथरी विद्युत केंद्रावर ब्रेकडाऊन झाला. मोठा बिघाड झाल्याने कर्मचाऱ्यांना तो लवकर दुरुस्त करता आला नाही; परंतु कर्मचाऱ्यांनी तब्बल सात तास अखंडितपणे काम करून मानवतकरांना वीज पुरवठा सुरळीत करून दिला.
मागील काही दिवसांपासून रात्री-मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मानवतकरांची झोप उडत आहे. कारण रात्रीच्या वेळी डासांच्या चाव्याने अबाल वृद्धांची झोपमोड होत आहे.
मानवतच्या नागरिकांकडून वीज देयकाची रक्कम वेळेत भरल्या गेल्याने मानवतकरांना भारनियमन नसल्यात जमा आहे. भारनियमन कमी असले तरी वीज ग्राहकांना चांगली सेवा मात्र मिळत नाही. कारण वीज वितरण कंपनीकडे योग्य प्रमाणात कर्मचारी वर्ग नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होते आणि लोकांच्या रोषालाही त्यांनाच बळी पडावे लागते. त्यामुळे मानवत येथे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वाढविण्याची गरज असून वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. (वार्ताहर)
वीज कर्मचाऱ्यांची दमछाकमानवत शहराचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर बी.आर. कांबळे, बी.पी. राऊत, ओ.आर. दायमा, सुनील माळनर, योगेश नावंडे, स्वप्नील शेटे, रामसिंग जुन्नी, सोमनाथ गळाकाटू यांनी पाथरी येथील १३२ के.व्ही. केंद्रावर जाऊन तसेच मानवतला वीज पुरवठा होणाऱ्या पूर्ण लाईनचे परीक्षण करून वीज सुरळीत करण्यासाठी तब्बल सात तास अविरत परिश्रम घेतले. यावेळी सहाय्यक अभियंता व्ही.एस. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता चेतन खटे हेही मार्गदर्शनासाठी सोबत होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच वीज पुुरवठा सुरळीत होऊ शकला.