मानव विकास मिशनकडून घाटीला साडे सात लाख
By Admin | Updated: December 1, 2014 01:26 IST2014-12-01T01:10:21+5:302014-12-01T01:26:02+5:30
औरंगाबाद : मानव विकास मिशनकडून घाटीला साडेसात लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

मानव विकास मिशनकडून घाटीला साडे सात लाख
औरंगाबाद : मानव विकास मिशनकडून घाटीला साडेसात लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पदव्युत्तर विद्यार्थी, ग्रामीण भागातून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या डॉॅक्टरांसाठी या निधीतून मॅनेकिन्स आणि इतर साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.
मानव विकास मिशनकडून राज्यातील २२ जिल्ह्यांत मानव विकास निर्देशांक वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे नियमित प्रशिक्षणासाठी घाटीत येतात. नवख्या डॉक्टरने थेट रुग्णांवर प्रात्यक्षिक केल्यास ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा डॉक्टरांनी प्रथम मॅनेकिन्स (मानवी शरीरातील अंतर्गत अवयवांसह प्लास्टिक प्रतिकृती) आणि अन्य साहित्याची गरज होती. मात्र, त्याकरिता निधी देण्याची मागणी घाटी प्रशासनाने मानव विकास मिशनकडे केली होती. मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंढे यांनी हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला. मुंढे यांनी आज साडेसात लाख रुपयांचा धनादेश मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टर चंद्रकांत लहाने, डॉ. अविनाश गुटे, डॉ. एकनाथ, डॉ. साळुंके आदींची उपस्थिती होती.