मनपाला उत्पन्न वाढीचा विसर
By Admin | Updated: August 11, 2014 01:54 IST2014-08-11T01:23:52+5:302014-08-11T01:54:59+5:30
नांदेड: शहरातील प्रमुख मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर महापालिकेने उत्पन्नवाढीकडेही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़ मागील सहा महिन्यापासून एलबीटी,

मनपाला उत्पन्न वाढीचा विसर
नांदेड: शहरातील प्रमुख मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर महापालिकेने उत्पन्नवाढीकडेही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़ मागील सहा महिन्यापासून एलबीटी, मालमत्ता कर, पारगमन शुल्क, गुंठेवारी या योजनेतून समाधानकारक वसुली झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़
शहरात विविध विकास योजना राबविणाऱ्या मनपाने आर्थिक उत्पन्नवाढीच्या स्त्रोतांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे़ आडात असूनही पोहऱ्यात येत नसल्याने दुसऱ्यांकडे भीक मागण्याची वेळ मनपावर आली आहे़ कोट्यवधींच्या कर्जाचा बोजा डोक्यावर घेतलेल्या महापालिकेने आपल्या मालकीच्या प्रमुख मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत़ केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मागील पाच, सहा वर्षात शहराचा कायापालट झाला़ महापालिकेला जेएनएनयुआरएम, बीएसयुपी व नगरोत्थान योजनेतंर्गत दीड हजार कोटींचे कामे करण्यात आली़
पुढील कामासाठी एक ते दीड हजार कोटी येणे बाकी आहे़ हा निधी मिळविण्यासाठी महापालिकेला स्वत:चा वाटा अगोदर भरावा लागणार आहे़ त्यासाठी मनपाने वेळोवेळी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले आहे़ स्थानिक संस्था कर, मालमत्ता कर, पारगमन शुल्क, पाणीपुरवठा, मलनिस:रण कर, गुंठेवारी हे पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीचे स्त्रोत आहेत़ पण या स्त्रोतांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे मनपाच्या तिजोरीत खणखणाट आहे़
उत्पन्न वाढीच्या मार्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाला योजनांचा निधी आपल्या फंडात वळती करता येत नाही़ त्यामुळे मागील वर्षभरापासून कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)
स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून मनपाला मिळणारे उत्पन्न सध्या घटल्यामुळे मनपाची स्थिती अवघड झाली आहे़ शासन एलबीटी पाहिजे की जकात यावर विचारमंथन करत आहे़ मात्र मनपाच्या उत्पन्नाला मागील तीन, चार महिन्यापासून ब्रेक मिळाला आहे़ २०११ - १२ मध्ये ४३ कोटी १८ लाख तर २०१३- १४ मध्ये ४५ कोटींच्या जवळपास महसूल मिळाला़ २०१४- १५ मध्ये ७० कोटींची महसूल अपेक्षीत आहे़