व्यवस्थापक, संचालकांवर गुन्हा
By Admin | Updated: February 4, 2015 00:40 IST2015-02-04T00:37:20+5:302015-02-04T00:40:30+5:30
तुळजापूर : ठेव योजनेत ठेवलेल्या २१ लाख २४ हजार रूपयांसाठी वारंवार चकरा मारूनही पैसे न देता शाखेतून हकलून दिल्याप्रकरणी ‘बीएचआर’च्या तुळजापूर येथील

व्यवस्थापक, संचालकांवर गुन्हा
तुळजापूर : ठेव योजनेत ठेवलेल्या २१ लाख २४ हजार रूपयांसाठी वारंवार चकरा मारूनही पैसे न देता शाखेतून हकलून दिल्याप्रकरणी ‘बीएचआर’च्या तुळजापूर येथील शाखाधिकाऱ्यासह कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष, संचालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, बँकेच्या शाखाधिकाऱ्यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लातूर येथील व्यापारी आनंद विमलचंद आग्रवाल (वय-३७) यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या तुळजापूर शाखेचे शाखाधिकारी दौलत सुधीर कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून शाखेत ‘संजीवन’ ठेव योजनेंतर्गत २१ लाख २४ हजार रूपये ठेवले होते़ या ठेवीची मुदत संपल्यानंतर व्यापारी आनंद आग्रवाल यांनी तुळजापूर येथील शाखेत पैशाची मागणी केली़
वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आनंद आग्रवाल यांनी सोमवारी ‘बीएचआर’च्या तुळजापूर शाखेत ‘पैसे दिल्याशिवाय जाणार नाही’ असा आक्रमक पवित्रा घेत ठाण मांडली़ त्यावेळी शाखाधिकारी कुलकर्णी यांनी ‘पैसे मिळणार नाहीत’ असे म्हणून हाकलून दिल्याची फिर्याद आनंद आग्रवाल यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून शाखाव्यस्थापक, शाखेतील कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानोबा मुंढे हे करीत आहेत़ (वार्ताहर)